घरमुंबईते संशयित अतिरेकी आमचे सदस्य नाहीत; सनातनचे घुमजाव

ते संशयित अतिरेकी आमचे सदस्य नाहीत; सनातनचे घुमजाव

Subscribe

वैभव राऊतसह स्फोटक प्रकरणात पकडलेले नऊ आरोपींशी आमचा काहीच संबंध नाही असा खुलासा आता सनातन संस्थेमार्फत करण्यात आला आहे.

दहशतवादी विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांत धडक कारवाई करत नालासोपारा येथून स्फोटकांसहीत वैभव राऊतला अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे. ही अटक झाल्यानंतर सनातन संस्थेने आक्रमक पवित्रा घेत वैभव राऊत आणि इतर आरोपींच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र आता सनातन संस्थेने घुमजाव करत पकडले गेलेले आरोपी आमचे सदस्या किंवा साधक नसल्याचे जाहीर केले आहे. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

सनातन संस्था पर पाबंदी की मांग तथा ? हिंदुत्वनिष्ठ संगठनोंपर झूठे आरोप इस विषयपर भूमिका स्पष्ट करने हेतु मुंबई में ? पत्रकार परिषदश्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्थाश्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदू जनजागृति समिति Join us : sanatan.org/sampark

Posted by Sanatan Sanstha on Monday, August 27, 2018

- Advertisement -

वैभव राऊत याला अटक झाल्यापासून सनातन संस्थेची बदनामी केली जात असून संस्थेभोवती एक संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. राऊतसह जे लोक पकडले गेलेत ते सनातनची साधक नाहीत. दहशतवादी विरोधी पथकाने अजून तपास पुर्ण केलेला नाही. गृहखात्यानेही अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव घेतलेले नाही. तरी आरोपी सनातन संस्थेचे असल्याचे सांगितले जाते. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याचा दावा आहे की, बकरी ईदला स्फोट घडवण्याचे प्लानिंग होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांचा रोप आहे की, मराठा मोर्चात स्फोट घडवायचा होता. मात्र एटीएस आणि सीबीआयकडे अशाप्रकारची कोणतीही माहिती नाही. हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचे काम जाणीवपूर्वक होत आहे, अशी बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू, अशी भूमिका चेतन राजहंस यांनी व्यक्त केली.

सनातनवरील बंदीची मागणी अयोग्य

शरद कळसकर, सचिन अंदुरे, रेगे यांची नावे माध्यमात आल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच ऐकली आहेत. सनातन संस्था ही अध्यात्मिक कार्य करणारी संस्था आहे. हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अटक केलेले ९ आरोपीपैंकी एकही सनातनचा नाही. फक्त एखाद्या फोटोत दिसले म्हणून तो सनातन संस्थेचा सदस्य मानायाच का? असा प्रश्नही सनातनकडून करण्यात आला आहे. कांग्रेस, सपा आणि राष्ट्रवादीशी संबंध असणारे पकडले गेले तर त्यांच्या प्रमुखाच्या अटकेची मागणी करणे किती योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करुन आठवले यांच्या अटकेची आणि सनातन संस्थ्येच्या बंदीची मागणी योग्य नसल्याचे चेतन राजहंस यांनी सांगितले.

- Advertisement -

म्हणून सनातनवर बंदी हवीच – नवाब मलिक

सनातन संस्था देश आणि राज्यातील तरुणांची माथी भडकवते. त्यांचे सदस्य कुठेही रजिस्टर नाहीत. त्यामुळेच त्यांचा सगळा कारभार उघड झाल्यानंतर, पकडलेले आरोपी आमचे नाहीत, असे सांगून सनातन हात झटकण्याचे काम करत आहे. तरुणांची दिशाभूल करणाऱ्या या संस्थेवर बंदी घालण्याची आमची मागणी आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -