घरमुंबईपारदर्शकता नसल्याने ध्वजनिधी संकलनावर शिक्षकांचा आक्षेप

पारदर्शकता नसल्याने ध्वजनिधी संकलनावर शिक्षकांचा आक्षेप

Subscribe

मुंबईसह राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी आर्मी फ्लॅग डेच्या निमित्ताने निधी गोळा केला जातो. शिक्षण विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांकडून हा निधी जमा केला जात असून या निधी गोळा करण्याच्या प्रक्रियेला सध्या शिक्षकांकडून नाराजीचा शेरा मिळाला आहे.

मुंबईसह राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी आर्मी फ्लॅग डेच्या निमित्ताने निधी गोळा केला जातो. शिक्षण विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांकडून हा निधी जमा केला जात असून या निधी गोळा करण्याच्या प्रक्रियेला सध्या शिक्षकांकडून नाराजीचा शेरा मिळाला आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप टीडीएफ या शिक्षक संघटनेकडून करण्यात आला असून शाळकरी विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारचा निधी गोळा करणे योग्य आहे का?असा सवाल संघटनेकडून करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांकडून ध्वजनिधीचे संकलन केले जाते. यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या क्षमतेनुसार हा निधी गोळा केला जातो. हा निधी गोळा करून सैन्य दलाकडे सुपूर्द केला जातो. हा निधी गोळा करताना विद्यार्थ्यांना एक कागद दिला जातो. त्यात प्रत्येकाने किती निधी गोळा केला ? याचे सविस्तर माहितीचे रकाने आखलेले असतात. मात्र, त्यात कोणताही क्रमांक नसल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. तर सरकारतर्फे राखीव निधी असतानादेखील हा निधी का गोळा केला जातो, असा प्रश्न देखील टीडीएफचे (टिचर्स डेमोक्रेटिक फ्रंट) उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी उपस्थित केला आहे.

भ्रष्टाचार होण्याची भीती
ध्वजनिधी गोळा करण्यासाठी कुठलीही पारदर्शकता नाही. यामुळे कोणी किती पैसे गोळा केले याला जसे काही पुरावे नसतात, तसे किती पैसे शाळेकडून निधीत देण्यात आले तेही कळत नाही. यामुळे भ्रष्टाचार होण्याची शक्यता अधिक असते. अशी अपारदर्शी व्यवस्था टाळली पाहिजे. पारदर्शी व्यवस्था करण्यात आल्यास निधी गोळा करण्यात अडचण येणार नाही.- राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीडीएफ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -