घरमहाराष्ट्र'त्या' २२ वर्ष दबल्या होत्या 'जटां'च्या अंधश्रद्धेखाली!

‘त्या’ २२ वर्ष दबल्या होत्या ‘जटां’च्या अंधश्रद्धेखाली!

Subscribe

लहान वयापासtन तमाशाच्या माध्यमातtन ओळख असणार्‍या मालती इनामदार या गेली २२ वर्षे एका अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्या होत्या. ही अंधश्रद्धा त्यांच्या कलेच्या आड येत होती. मात्र अंनिसने त्या अंधश्रद्धेला पूर्णविराम दिला आहे.

लहान वयापासुन तमाशाच्या माध्यमातुन ओळख असणार्‍या मालती इनामदार या गेली २२ वर्षे एका अंधश्रद्धेच्या विळख्या अडकल्या होत्या. ही अंधश्रद्धा त्यांच्या कलेच्या आड येत होती. मात्र अंनिसने त्या अंधश्रद्धेला पूर्णविराम दिला.
जुन्नर तालुक्याला तमाशाची पंढरी म्हटले जाते. मात्र याच तमाशाच्या पंढरीत एका तमाशा कलावंतीनीला अंधश्रद्धेने वेढले होते. जेष्ठ तमाशा कलावंत मालती इनामदार या तब्बल २२ वर्षे आपल्या डोक्यावरील जटांचे ओझे घेऊन फिरत होत्या. मालती इनामदार नारायणगाव येथे त्यांच्या घरी अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिता जाधव यांनी या जटा काढून त्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढले आहे.

ज्या महिलांनी जटा वाढविल्या आहे त्यांनी गुरु करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मालती इनामदार यांनीही सोलापुर जिल्हातील एका गावात एका व्यक्तीला गुरु केले आहे. त्याच गुरुंच्या आदेशाने या जटा काढल्या जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असते. मालती इनामदार यांच्या जटा काढण्यासाठी त्या व्यक्तीने 50 हजार रुपये खर्च येईल असे सांगितले होते. पैशाच्या लोभापोटी या लोकांनी २२ वर्षे एका कलागुणांनी संपन्न असणार्‍या एका कलावंत महिलेला वेटीस धरुन तिच्या मनात अंधश्रद्धेचे भुत भरवले होते.

- Advertisement -

कोण आहेत मालती इनामदार? 
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आणि जेष्ठ तमाशा सम्राज्ञी विठ्ठबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्या त्या कन्या आहेत. तमाशा जगतात एक वेगळी ओळख तयार करत जगणं-मरणं कलेसाठी ही भावना मनात ठेवून लहानपणापासून त्यांनी तमाशात काम सुरु केलं. आपल्या कलेतुन त्यांनी लोकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र मागील २२ वर्षे त्या आपल्या डोक्यावर जटा सांभाळून होत्या.

काय होती अंधश्रद्धा?
अज्ञान, अंधश्रेद्धेची परंपरा जोपासत मालती इनामदार यांनी आपल्या केसांच्या जटा आजपर्यंत वाढविल्या होत्या. 1996 मध्ये थोड्या प्रमाणात जटा आल्या होत्या. त्यावेळी कुटुंबातील लोकांनी देवीच्या जटा आहेत म्हणून काढू दिल्या नाहीत. या जटा काढल्या तर अंगात देवी येईल, देवीचा प्रकोप होईल, घरातल्या इतर लोकांना त्रास होईल अशी भीती अनेकांनी दाखविल्याने त्यांनी आजपर्यंत केसांच्या जटा वाढविल्या होत्या.

देवाचा कोप होईल याची आम्हाला भीती होती म्हणून मी या जटा वाढविल्या होत्या.मात्र ही अंधश्रद्धा असल्याचे अंनिसच्या महिलांनी माझ्या निदर्शनास आणून दिले आणि आज २२ वर्षानंतर या त्रासातुन मी मुक्त झाले आहे.
मालती इनामदार, तमाशा कलावंत

अंधश्रद्धेमुळे महिला जटा काढायला तयार होत नाहीत. कुटुंबातील लोक ही जटा काढायला तयार होत नाहीत. कुटुंबाचा सपोर्ट असेल तर जटा काढण्यास महिला तयार होतील. आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून ७१ महिलांच्या जटा काढल्या असुन अशा अंधश्रद्धेच्या जाळ्यात कुणीही अडकू नये.
नंदिता जाधव, अंनिस, जिल्हा कार्याध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -