घरमुंबईईव्हीएमचा जाणीवपूर्वक गोंधळ

ईव्हीएमचा जाणीवपूर्वक गोंधळ

Subscribe

 

पालघर लोकसभा मतदार संघातील २८३ एव्हीएम मशीन नादुरुस्त झाल्यामुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. भाजपने जाणीवपूर्वक हा ईव्हीएम मशीनचा गोंधळ घातला असल्याचा आरोप बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या साम, दाम, दंड, भेदाच्या विधानामागील कुटनिती म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून भाजपाने केलेला निवडणुकीतील सेटींगचा हा रडीचा डाव असल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला.

- Advertisement -

सोमवारी सकाळी ७ वाजता पालघर लोकसभेच्या सहा विधानसभा मतदार संघात मतदानाला सुरवात झाली. मात्र, मतदानाला सुरुवात होताच अनेक मतदान केंद्रातील एव्हीएम मशीन कार्यान्वीत झाल्या नाहीत. तर काही ठिकाणी १५ ते २० मते पडल्यानंतर मशीन्स बंद पडल्या. एकामागोमाग एक अशा अनेक ठिकाणी मशीन्स बंद पडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे केवळ बोटाला शाई लावून मतदारांना मतदान न करताच माघारी फिरावे लागले. तर काही मतदारांना तब्बल दोन-अडीच तास ताटकळत बसावे लागले. यामुळे मतदारांना मतदानाचा आग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचेही हाल झाले.

मशीन बंद पडल्यानंतर घरी गेलेल्या मतदारांना अक्षरशः विनवणी करून त्यांना पुन्हा मतदान केंद्रापर्यंत आणण्याची कसरत कार्यकर्त्यांना करावी लागली. मशीनचा गोंधळ थोडाफार दुरुस्त झाल्यावर तोच वी.वी. पॅडही बंद पडू लागल्यामुळे मतदारांना मत देता आले नाही. या सगळ्याचा राग मतदारांकडून कार्यकर्ते आणि मतदान कर्मचाऱ्यांवर काढला जात होता. या सर्व गोंधळामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी २८.२२ टक्के इतकेच मतदान झाले. बंद पडणाऱ्या एव्हीएम मशीनबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, फक्त ९७ मशीन बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धूळ आणि कडक उन्हामुळे मशीन्स बंद पडत असल्याचे ते म्हणाले. बंद पडलेल्या मशीनच्या जागी ताबडतोब दुसऱ्या मशीन लावण्यात आल्या मात्र, या बदलाबदलीत काही वेळ वाया गेल्याचेही त्यांनी सांगितले. मशीन बंद पडल्यामुळे वाया गेलेला वेळ मतदानासाठी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली मात्र, ती अमान्य करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -