घरमुंबईभिवंडीत एका वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण

भिवंडीत एका वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण

Subscribe

भिवंडीमध्ये लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सतत अपहरणाच्या घटना घडत असल्यामुळे शहरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

भिवंडीच्या धामणकर नाका येथील उड्डाणपुलाखाली फुटपाथवर झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याचे सकाळी तीन वाजता अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भिवंडीमध्ये लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सतत अपहरणाच्या घटना घडत असल्यामुळे शहरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपहरण झालेल्या एक वर्षीय बालकाचे नाव आसिफ चंदूला हरिजन असे आहे. त्याचे वडील उड्डाणपूलाखाली बूटपॉलिशचे काम करतात आणि तिथेच ते राहतात. या बालकाचे कुटुंबीय मुळचे उत्तर प्रदेशचे असून रोजगारासाठी ते भिवंडीत आले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

अपहरण झालेल्या बालकाच्या वडिलांचे नाव चंदूला रामप्यारे हरिजन असे आहे. ते मुळचे उत्तर प्रदेश राज्यातील फैजाबादच्या चणाडाळ गावाचे रहिवासी आहेत. पाच दिवसांपूर्वी ते रोजगाराच्या शोधासाठी भिवंडीत दाखल झाले. निवासाची व्यवस्था म्हणून त्यांनी धामणकर नाका येथील उड्डाणपुलाखाली आपले बस्तान मांडले. चंदूला यांनी उड्डाणपुलाखालीच बूटपॉलिशचा व्यावसाय सुरु केला. दरम्यान, उड्डाणपुलाखाली २ जून रोजी रात्री सर्व कुटुंबीय झोपलेले असताना पहाटे तीन वाजता तिथे आलेल्या अज्ञात अपहरणकर्त्याने आईच्या कुशीत झोपलेल्या आसिफला उचलून पलायन केले. चार वाजता बालकाची आई रेणुकाला जाग आली. आपला मुलगा जवळ नाही हे पाहून तिने आजुबाजूला त्याला शोधले. त्यानंतर तिने कुटुंबियांकडे चौकशी केली. आपला मुलगा मिळाला नाही म्हणून तिने हंबरडा फोडला. त्यानंतर कुटुबियांनी पोलीस स्थानक गाठून आपल्या मुलास पळवून नेल्याबाबत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

सीसीटीव्हीत आरोपी कैद

याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय तपास लावत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली तेव्हा एक इसम मुलाला गोणपाटमधून नेत असल्याचे दिसत आहे. या इसमाचा शोध पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पवार घेत आहेत. दरम्यान, अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांनी कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -