घरमुंबईओशो आश्रमात जाण्यास मनाई नाही; नियमांसाठी धर्मादाय आयुक्तांकडे जा- हायकोर्ट

ओशो आश्रमात जाण्यास मनाई नाही; नियमांसाठी धर्मादाय आयुक्तांकडे जा- हायकोर्ट

Subscribe

अमर मोहिते

 

- Advertisement -

मुंबईः ओशे आश्रमात जाण्यास मनाई करण्यात आलेली नाही. व्यवस्थापनेला काही नियम करायचे असल्यास त्यांनी उप किंवा सह धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज करावा. धर्मादाय आयुक्तांनी त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुकेश कांतीलाल सरडा उर्फ स्वामी मुकेश भारती यांनी यासाठी अर्ज केला होता. हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. ओशो आश्रम आणि समाधीपर्यंत जाण्यास कोणतेही निर्बंध नाहीत, असे आदेश उच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट २०२२ रोजी दिले होते. त्यानुसार ओशो अनुयायांना आश्रमात जाण्यास कोणतीही मनाई नाही. ओशो समाधीपर्यंत जाण्यासही मनाई केलेली नाही. मात्र अनुयायांनी आश्रमात किंवा ओशो समाधीला भेट देताना गळ्यात माळा घालू नये. तसेच प्रवेशासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ठराव मंजूर करुन हे दोन नियम तयार करण्यात आले आहेत. याआधीही अनुयायी शुल्क देत होते, असे अर्जदारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

- Advertisement -

स्वतंप्रवेशासाठी शुल्क आकारले जात असेल तर आम्ही विशेष सवलत मागत नाही. आम्ही केवळ समाधी ठिकाणी जाणार आहोत. मेडिटेशन सेंटर, ग्रंथालय या ठिकाणी जाणार नसू तर आम्हाला शुल्क देण्याची आवश्यकता नाही. दर्शनासाठी शुल्क आकारले जात आहे असे कुठेही नमूद केलेले नाही, असा दावा प्रतिवादींनी न्यायालयात केला. आश्रमाच्या प्रवेशाद्वाराजवळच शुल्क घेतले जाते. हे शुल्क भरल्यानंतर समाधीपर्यंत जाता येते, असा युक्तिवाद  अर्जदारांच्यावतीने करण्यात आला.

त्यावर न्यायालय संतप्त झाले. अशा गोष्टींसाठी न्यायालयाने वेळ घालवणे योग्य नाही. आम्ही स्पष्ट केले आहे की समाधीजवळ जाण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत म्हणजे कोणतेच निर्बंध नाहीत. पण ही मनाई नियमाला अनुसरुनच असेल. जर अर्जदारांना काही नियम करायचे असतील तर त्यांनी सह किंवा उप धर्मादाय आयुक्तांकडे यासाठी अर्ज करावा. धर्मादाय आयुक्तांनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात २१ मार्चला संबोधी दिन झाला. ओशो यांचे जगभरात असंख्य अनुयायी आहेत. या दिवशी ओशोंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अनुयायी पुणे येथील आश्रमात येतात. त्यानुसार अनुयायी ओशो आश्रमात आले होते. त्यावेळी सन्यासी माळा घातलेल्या अनुयायांना आश्रम व्यवस्थापनाने प्रवेश नाकारला. त्यामुळे १५० ते २०० अनुयायांनी गेट तोडून आश्रमात प्रवेश केला. अनुयायी आक्रमक झाल्याने आश्रमात तणावाचे वातावरण होते. कोरोगाव पार्क पोलीस तत्काळ आश्रमात दाखल झाले. पोलिसांनी अनुयायांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. ही धुमचक्री रोखण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे संबोधी दिनाला गालबोट लागले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -