आधार-पॅन लिंक करण्यासाठी मुदतवाढ

आता ही मुदतवाढ ३१ मार्चपर्यंत देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ही मुदतवाढ जाहीर केली आहे.

pan-aadhaar linking deadline is extended to march 2020
आधार-पॅन लिंक करण्यासाठी मुदतवाढ

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली मुदत वाढवण्यात आली आहे. आता, नवीन वर्षातील ३१ मार्च २०२० पर्यंत नागरिकांना आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येणार आहे. याआधी आधार-पॅन जोडणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण, आता ही मुदतवाढ ३१ मार्चपर्यंत देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ही मुदतवाढ जाहीर केली आहे.

आठव्यांदा मुदतवाढ

पॅन आणि आधार परस्परांशी संलग्न न केल्यास पॅन कार्ड रद्द करण्यात येईल, असे याआधीच सीबीडीटीने स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, अद्याप ही जोडणी न करणाऱ्या करदात्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली होती. तर, यापूर्वीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली होती. पण, आता पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्यात आली असून २०२० च्या ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. दरम्यान, पॅनला आधारशी जोडण्याची मुदत ८व्यांदा वाढवण्यात आली आहे. पॅन आणि आधार जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आधार-पॅन लिंक असणे बंधनकारक

यापूर्वी ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपत होती. पॅन कार्ड आधारशी जोडणे आयकर विभागाने बंधनकारक केले आहे. इन्कम टॅक्स भरण्यासाठी आधार पॅनशी जोडणे बंधनकारक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स भरण्यासाठी आधार-पॅन लिंक असणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी आयकर विभागाने असे म्हटले होते की, आधारशिवाय पॅनकार्ड पुढील वर्षापासून रद्द केले जाऊ शकते. तसेच अशा करदात्यांना आयटीआरदेखील दाखल करता येणार नाही. परंतु आता ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्व पॅन धारकांनी लवकरात लवकर स्थिती तपासून घ्यावी आणि आधारशी जोडले पाहिजे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार पॅनशी जोडणे बंधनकारक आहे. १ एप्रिल २०१९ पासून आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार-पॅन लिंक असणे बंधनकारक केले आहे.

३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ

यापूर्वी आयकर विभागाने असे म्हटले होते की, आधारशिवाय पॅनकार्ड पुढील वर्षापासून रद्द केले जाऊ शकते. तसेच अशा करदात्यांना आयटीआरदेखील दाखल करता येणार नाही. पण, आता ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व पॅन धारकांनी लवकरात लवकर पॅन आणि आधारशी जोडले पाहिजे.

हेही वाचा – आजपासून मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख