घरCORONA UPDATEजेईई, नीटची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी पालक आक्रमक

जेईई, नीटची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी पालक आक्रमक

Subscribe

जेईई व नीट या परीक्षा रद्द करण्याऐवजी ती पुढे ढकलण्यात यावी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सप्टेंबरमध्ये होणारी परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेने केली आहे.

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सप्टेंबरमध्ये होणार्‍या जेईई व नीटच्या परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी देशभरातील पालकांनी केली आहे. दरवर्षी २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी जेईई व नीट परीक्षा देतात. त्यामुळे सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतल्यास आरोग्य सुरक्षा पुरवण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते व विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पालकांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे. मात्र जेईई व नीट या परीक्षा रद्द करण्याऐवजी ती पुढे ढकलण्यात यावी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सप्टेंबरमध्ये होणारी परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व केंद्र सरकारला पत्राद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे आपल्या मूळ गावी गेले आहेत. कंटेमेंट झोन असलेल्या ठिकाणांवरील विद्यार्थी घराबाहेर पडू शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सेवेचा अभाव जाणवत आहे. त्यातच इंजिनियरींग प्रवेशासाठी आवश्यक असलेली जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर, जेईई अ‍ॅडव्हान्स २७ सप्टेंबर आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा १३ सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा प्रथम एप्रिलमध्ये त्यानंतर जुलै आणि आता सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरवर्षी सुमारे १० लाख विद्यार्थी जेईईची तर सुमारे १६ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. परंतु राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती पाहता ही परीक्षा डिसेंबरपर्यंत ढकलण्यात यावी अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनने केली आहे.

सोशल डिस्टसिंग राखत केंद्रांवर परीक्षा घेणे अवघड

बिहारमध्ये जेईई परीक्षेला एक लाख विद्यार्थ्यांसाठी सात केंद्र आहेत. तर नीट परीक्षेसाठी फक्त दोन जिल्ह्यांमध्येच केंद्र आहेत. त्यामुळे सोशल डिस्टसिंग राखत केंद्रांवर परीक्षा घेणे अवघड आहे. त्याचप्रमाणे अनेक केंद्रांवर थम्बप्रिंट स्कॅनर, फेस व्हेरिफिकेशन, संगणक कक्षातील मोजकेच संगणक, स्वच्छतागृह अशा अनेक समस्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना १०० किलोमीटरचे अंतर पार करत परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागते. विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेईई, नीटची परीक्षा सप्टेंबरऐवजी डिसेंबरमध्ये घेण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आल्याची माहिती इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. अनुभा सहाय यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -