घरताज्या घडामोडीओबामासह अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक करणारा १७ वर्षीय सूत्रधार अटकेत

ओबामासह अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक करणारा १७ वर्षीय सूत्रधार अटकेत

Subscribe

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आतापर्यंतची सर्वात मोठी हॅकिंग घटना घडली होती. यादरम्यान अनेक मोठे प्रोफाइल अकाउंट्स हँक केले गेले. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, अमेरिकेतील रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेतील नेते जो बिडेन, इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, वॉरेन बफे, Apple, उबर आणि इतरांची ट्विटर अकाउंट हॅक झाली होती. ही एक मोठी हॅकिंगची घटना होती आणि हे हॅकिंग कोणत्याही हॅकिंग ग्रुपने केले नव्हते. माहितीनुसार, या मोठ्या हॅकिंगच्या घटनेमागे १७ वर्षाच्या तरुणात हात आहे. या दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक करून याने १ लाख डॉलरचा घोटाळा केला.

या १७ वर्षाच्या तरुणाचं नाव ग्रॅहम इव्हान क्लार्क असं आहे. तो फ्लोरिडाचा रहिवाशी असून तो ग्रॅजुवेट आहे. या तरुणाला अटक केली असून त्यांच्यावर ३० आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये फसवणूक, हॅकिंग आणि गुन्हेगारी यासारखे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत. ग्रॅहम इव्हान क्लार्क या हॅकिंगच्या घटनेचा मास्टरमाइंड होता आणि त्याच्यासोबत आणखी दोन जण सामील होते. यामध्ये १९ वर्षांचा ब्रिटनमध्ये राहणार मेसन जॉन तर दुसरा २२ वर्षांचा हॅकर निमाला फजेली यांचा समावेश होता.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी घडलेल्या हॅकिंगनच्या घटनेनंतर एक अशी बातमी समोर आली की, या हॅकिंगमागे Mr Krik नावाचा व्यक्ती आहे. Mr Krik नावाचा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून तो क्लार्क आहे, असे उघडकीस आले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, हे हॅकिंगचे प्रकरण हाताळणारे फ्लोरिडाच्या वकिलांनी म्हटले की, ग्रॅहम इव्हान क्लार्क इतका हुशार आहे की त्याला ट्विटरच्या इंटरनल नेटवर्क देखील पकडू शकलं नाही.

आतापर्यंत ट्विटरवर क्लार्कने सर्वात मोठे हॅकिंग कसं केलं?

अलीकडेच ट्विटरने एका निवेदनात म्हटलं आहे की, हे हॅकिंग स्पीयर फिशिंगच्या माध्यमातून केलं गेलं होतं, असं तपासणीनंतर कंपनीला आढळले आहे. तसेच या तिघांना पकडल्यानंतर या हॅकिंगसाठी स्पीयर फिशिंगचा वापर केल्याचं समोर आलं.

- Advertisement -

दरम्यान क्लार्कने ट्विटरच्या कर्माऱ्यांना असं काही गुंडाळलं होत की, त्यांना वाटलं हा आपल्या कंपनीतला कर्मचारी आहे आणि तो तंत्रज्ञान विभागात काम करतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, क्लार्कने तंत्रज्ञान विभागाचा कर्मचारी सांगून कस्टमर सर्व्हिस पोर्टलचा ऐक्सेस मिळवला होता. यानंतर तीन हॅकर्सने मिळून १३० अकाउंट्स हॅक केले आणि बिटकॉइन घोटाळा केला.

क्लार्कने यापूर्वी अनेक गोष्टी हॅकिंग केल्या होत्या. त्यामुळे तपास यंत्रणाही त्याला आधीपासूनच ट्रॅक करत होती. अहवालानुसार, ट्विटर हॅकिंग पूर्वी एप्रिलमध्ये सीक्रेट सर्व्हिसने ७ लाख डॉलर्स किंमतीचे बिटकॉइन जप्त केले होते. एफबीआयने म्हटले आहे की, फजेली आणि क्लार्क या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहेत तर शेफर्डला देखील ताब्यात घेण्यात येणार आहे. यावेळी या हॅकर्सना आठवड्यातच पकडण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -