घरमुंबईकल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर यांच्या उमेदवारीला विरोध

कल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर यांच्या उमेदवारीला विरोध

Subscribe

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र स्थानिक शिवसैनिकांनी भोईर यांच्या उमेदवारीला विरोध करीत सामुहिक राजीनामे दिले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली तरच काम करू, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. ग्रामीणमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश म्हात्रे हे इच्छूक होते. मात्र शिवसेनेने भोईर यांना उमेदवारी दिल्याने म्हात्रे समर्थक नाराज झाले आहेत. शिवसैनिकांनी एकत्रीत येऊन पदाचे राजीनामे दिले तसेच ‘सुभाष भोईर मुर्दाबाद’, ‘रमेश म्हात्रे जिंदाबाद’च्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. सुभाष भोईर यांनी पाच वर्षात ‘कुठलंही काम केलं नाही. उलट शिवसैनिकांना त्रास दिला’, असा आरोपही शिवसैनिकांनी केला. त्यामुळे सेनेतील अंतर्गत वादाचा फटका भोईर यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -