घरमुंबईमालाडमध्ये झाड पडून एक व्यक्ती गंभीर जखमी

मालाडमध्ये झाड पडून एक व्यक्ती गंभीर जखमी

Subscribe

सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई मालाड पश्चिमेतील राठोडी गावात झाड पडून एक व्यक्ती गंभीर झाल्याची घटना घडली. या ठिकाणी ताडाचे मोठे झाड पडून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. राठोडी गावातील महालक्ष्मी चाळीतील रहिवासी मार्कांडे सिंग यांच्यावर हे झाड कोसळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आहे.

मार्कांडे सिंग यांची प्रकृती गंभीर

रात्री जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी चाळीतील घरांवर पडले. संध्याकाळची वेळ असल्याने लोकं घराबाहेर होती. मात्र तेथे उपस्थित असलेल्या मार्कांडे सिंग यांच्यावर पडले असून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. ही घटना घडल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही उपचार झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयातून कांदिवली पश्चिमेतील महापालिकेच्या डॉ. बी. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आले आहे. मार्कांडे सिंग हे घरात एकटेच होते. त्यांची पत्नी व दोन चिमुकले गावी गेले होते. त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुले सुदैवाने बचावली आहेत.

- Advertisement -

झाडासंदर्भात विकासकाकडे याआधी करण्यात आली होती तक्रार

हे झाड पडून तिथल्या चार घराचंदेखील नुकसान झालं आहे. हे झाड खाजगी विकासकाच्या जागेत होत. झाड कधीही पडू शकतं याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिका आणि प्रशासनाला अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र पालिकेसह विकासकाने याकडे दुर्लक्ष केले. या झाडासह इतर चार झाडेदेखील पडली आहेत. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. येथील विकासकाने झाडांकडे आणि पर्यायी लोकांकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -