घरट्रेंडिंग'नाव बदलू' भाजप; मुगलसरायचं नामकरण उपाध्यय जंक्शन

‘नाव बदलू’ भाजप; मुगलसरायचं नामकरण उपाध्यय जंक्शन

Subscribe

भाजप सत्तेत आल्यापासून रेल्वे स्थानकांच्या नामकरणात बदल करण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर प्रदेशातील चंदोलीमधील ‘मुगलसराय’ स्थानकाचे नाव बदलणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली. भाजपचे सहसंस्थापक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)चे प्रसारक पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव मुगलसरायला देण्यात येणार आहे. या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी नाराजी दर्शवली असून दोघांनीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

उपाध्याय यांचं मुगलसराय स्थानकाशी नातं

१९६८ साली पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत मुगलसराय स्थानकावर आढळला होता. तेव्हापासूनच या स्थानकाला उपाध्याय यांचे नाव देण्याची मागणी आरएसएस करत आहे. ही मागणी भाजप सरकारच्या काळात पूर्ण होत असून तब्बल ५० वर्षांनंतर या स्थानकाला उपाध्याय यांचे नाव देण्यात येणार आहे. यापुढे हे स्थानक ‘पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन’ नावाने ओळखले जाणार आहे.

भाजपचे सहसंस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय

मुंबईत ओशिवराचं झालं राम मंदिर

मुंबई पश्चिम रेल्वे मार्गातील जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान असलेल्या ‘राम मंदिर’ स्थानकाचेही नाव भाजप सत्तेत आल्यामुळे ठेवण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना या स्थानकाचे नाव ‘ओशिवरा’ ठरवण्यात आले होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर भाजप सत्तेत आली आणि ‘ओशिवरा’चे नामकरण ‘राम मंदिर’ असे झाले.

- Advertisement -
राम मंदिर स्थानक

एलफिन्स्टन रोड होणार प्रभादेवी
गेल्या वर्षी एलफिन्स्टन रोड स्थानकाचं नाव ‘प्रभादेवी’ तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनलचं नामविस्तार करून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल’ करण्याचा विधान सभेत मांडण्यात आलेला प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला होता. केंद्रीय गृह विभागाने रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यास मान्यता दिल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही या संदर्भातील पत्रक जारी करत नामांतराला मंजुरी दिली. प्रत्यक्षात मात्र अजूनही स्थानकावरील नाव बदलण्यात आलेले नाही.

एलफिन्स्टन रोड स्थानक

पश्चिम रेल्वेवरील स्थानकाला ‘एलफिन्स्टन रोड’ हे नाव लॉर्ड एलफिन्स्टन यांच्या नावावरून देण्यात आलं होतं. ते १८५३ ते १८६० या काळात ‘गव्हर्नर ऑफ बॉम्बे’ होते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -