घरमुंबईभिवंडीत नशेसाठी गुंगीचे औषध विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांची झडप

भिवंडीत नशेसाठी गुंगीचे औषध विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांची झडप

Subscribe

भिवंडी शहरातील नशेखोर ग्राहकांना हेरून त्यांना नशेसाठी औषधाचा पुरवठा कारमधून करणाऱ्या एका आरोपीला शांतीनगर पोलिसांनी झडप घालून अटक केली आहे.

भिवंडी शहरातील नशेखोर ग्राहकांना हेरून त्यांना नशेसाठी औषधाचा पुरवठा कारमधून करणाऱ्या एका आरोपीला शांतीनगर पोलिसांनी झडप घालून अटक केली आहे. या आरोपीकडून स्कॉर्पिओ कारसह तब्बल ३ लाख १० हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अकबर शौकत शेख (वय २२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र त्याचा एक अनोळखी साथीदार फरार झाला आहे. शाळा, कॉलेजसह झोपडपट्टी परिसरातील नशेखोर ग्राहकांना हेरून त्यांना नशेसाठी औषधाचा पुरवठा करण्याच्या हेतूने आरोपी अकबर हा कारमधून औषध विक्री करीत असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागाव परिसरातील गॅलेक्सी सिनेमानजीक आरोपीवर पाळत ठेवून त्याच्याकडून सिरपच्या तब्बल १०० बाटल्यांचा साठा कारमधून जप्त केला आहे.

एक लाख रुपये किंमतीची औषध

मात्र यावेळी अंधाराचा फायदा घेत त्याचा साथीदार पळून गेला तर अकबर हा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पकडण्यात आलेल्या अकबरकडे औषधे तसेच सौंदर्य प्रसाधन कायद्याअंतर्गत कोणताही परवाना नसताना त्यांनी नशेसाठी एम कॉरेक्सच्या ४१ बाटल्या आणि रेक्सो कंपनीच्या सिरपच्या ५९ औषधाच्या बाटल्या अशा जवळपास एक लाख रुपये किंमतीच्या औषधाच्या बाटल्या तसेच २ लाखाची स्कॉर्पिओ गाडी असा सुमारे ३ लाख १० हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ अधिक तपास करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -