घरमुंबईडोंबिवली पोलीस ठाण्यात महिला सहकर्मचाऱ्याची छेडछाड

डोंबिवली पोलीस ठाण्यात महिला सहकर्मचाऱ्याची छेडछाड

Subscribe

डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात काम करत असतानाच एका महिला पोलिसाचा तिची परवानगी नसताना मोबाईलवर व्हिडिओ काढल्या प्रकरणी आरपीएफच्या जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात काम करत असतानाच एका महिला पोलिसाचा तिची परवानगी नसताना मोबाईलवर व्हिडिओ काढल्या प्रकरणी आरपीएफचे जवान मनफुल सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडूनच महिलांच्या छेडछाडीचा प्रकार तोही पोलीस ठाण्यात झाल्याने खळबळ उडाली आहे. यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

काय आहे घटना 

गुरुवार, १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनी महिला पोलीस कर्मचारी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे काम करत होत्या. त्यावेळी मनफुल सिंग हे काही कामानिमित्त लोहमार्ग पोलीस ठाण्यात आले होते. मनफुल सिंग यांनी त्या महिला कर्मचाऱ्याची परवानगी न घेता त्या काम करत असतानाचा १० संकेदाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल वरून काढला. महिला कर्मचाऱ्याच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी मनफुल सिंगला जाब विचारत त्याच्याकडील मोबाईल तपासला असता व्हिडिओ आढळून आला. संतापलेल्या महिला कर्मचाऱ्याने त्या जवानाविरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मनफुल सिंग यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -