घरमुंबईमुख्यमंत्री..., गाजर... आणि मनसे...; पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस!

मुख्यमंत्री…, गाजर… आणि मनसे…; पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस!

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील मेसेज व्हायरल केल्यामुळे मनसेचे विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेथे यांना रामनगर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवारी डोंबिवलीत येत आहे. त्यानिमित्त मनसेने डोंबिवलीकरांना सगळ्यात जास्त गाजर देणारे येत आहेत, असा उल्लेख असणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मनसेचे विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेथे यांना रामनगर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. डोंबिवलीच्या ६५०० कोटीची आश्वासनं? असाही प्रश्नही मनसेने केला आहे.

mns
मनसे बॅनर

काय आहे व्हायरल मेसेजमध्ये

फडणवीस सरकारने जनतेला गाजर दाखवले असल्याचा उल्लेख अप्रत्यक्षपणे या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर रवींद्र जेधे यांच्या लेटरहेडवर हा मजकूर आहे. यामध्ये ६५०० कोटी, प्रॉबेस दुर्घटना ग्रस्तांना मदत, बहिणींकडून मागवलेल्या सूचना, स्मार्ट सिटी या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

- Advertisement -
mns
पोलिसांची नोटीस

काय म्हटले आहे तक्रारीत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीच्या दौऱ्यावर येत असतानाच त्या अनुषंगाने व्हॉट्सअॅपद्वारे संदेश प्रसारीत करून या संदेशात डोंबिवलीकरांना सगळ्यात जास्त गाजर देणारे येत आहेत आपल्या डोंबिवलीत. असा संदेश लोकांमध्ये प्रसारीत केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही नोटीस बजावली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -