घरठाणेपोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो कुटुंबांचे ठाण्यात स्थलांतर

पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो कुटुंबांचे ठाण्यात स्थलांतर

Subscribe

मरीआई, भवानीवाले, बहुरुपी तालुक्यात दाखल

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यात रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने येथील शेकडो कुटुंबे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शहरी भागातील वीटभट्ट्यांवर किंवा पुणे नगर व नाशिक जिल्ह्यात स्थलांतर करतात. तर कोरोनाच्या महामारीला न जुमानता पुणे, परभणी, बीड, बारामती सुपे परगण्यातील शेकडो कुटुंबे ठाणे जिल्ह्यात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आश्रयाला आली आहेत. यात रानावनात भटकणारे मेंढपाळ, मरीआई, भवानीवाले, बहुरुपी जमात, कसरती करामती, पोवाडे, डफली, सारंगी, हलगी या साधनांंवर केवळ करमणूक करीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

पुणे जिल्ह्यातून स्थलांतरीत होण्यात धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात असून त्याचबरोबर भोरपी व भटक्या जमातीमधील बहुरुपी, भवानी, मरिआई, भगवान शंकर, गुरुचेला आदिरुपे घेऊन आपला चरितार्थ चालवत आहेत. बारामती सुपे परगण्यातून सुमारे १३०० कुटुंबे मुरबाड शहापूर कल्याण आणि अंबरनाथच्या ग्रामीण पट्ट्यात स्थलांतरीत वास्तव्यास आहेत.
नोव्हेंबर ते जून अखेरपर्यंत मेंंढपाळांचे कुटुंबच सोबत असल्याने मेंढपाळांची मुले नातवंडे ही शिक्षणापासून वंचित राहताना दिसतात. आमचे भोग आमच्या मुले व नातवंडांच्या वाट्याला येत असल्याची खंत येथे असलेले वृद्ध आणि नावाजलेले पहिलवान सोमा देवकाते यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

धनगर समाजापाठोपाठ भटके समाज म्हणून गणले जाणारे बहुरुपी (भोरपी) हे हातावरची भवानी, मरिआई, संबळ, पिंगळा, वाघ्या मुरळी, गुरूचेला, भगवान शंकर, पोलिसदादा अशा प्रकारची विविध रूपे घेऊन गेले तीनचार महिने ग्रामीण भागातील गावोगावी फिरताना दिसून येतात. गावागाात फिरुन आपली कला सादर करून दिवस काढीत आहेत. भवानीचा खेळ करताना अंगावर चाबकाचे फटकारे मारणारा नारायण पवार यानेही आपल्या व्यथा सांगताना त्याचे डोळे पाणावले. कोरोनाच्या महामारीत अत्यंत दयनीय परिस्थितीत आम्ही जीवन जगत आहोत. आमच्या मुलांना शासनाच्या कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. अंगात बळ आहे तोपर्यंत पाठीवर आसूड ओढीत रोजच एका गावाहून दुसर्‍या गावाकडे हा मरिआईचा गाडा फिरवत राहवे लागत आहे. आमच्याभोवतीचे हे दृष्टचक्र थांबणार केव्हा?,असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -