मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बॉलिवूड कलाकारांचे तोंडावर बोट, चाहत्यांमध्ये मोठी नाराजी

भारताची आर्थिक राजधानी असणारे शहर म्हणजे मुंबई. तसेच, स्वप्नांची नगरी म्हणूनही मुंबईला ओळखले जाते. भारतातील अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. परंतु, मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना करावा लागतो आहे.

मुंबईतील रस्त्यांची सातत्याने दुरूस्ती करूनही खड्डे निर्माण होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मुंबईतील याच खड्ड्यांची उच्च न्यायालयाने दखल घेतली असून मुंबईतल्या दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा अहवाल स्वत: पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सादर करावा, असे आदेशच न्यायालयाने दिले असताना मात्र बॉलिवूडमधील एकही कलाकार या खड्डयांबाबत एकही कमेंट किंवा ट्विटरवर काही लिहत नसल्याचे चाहत्याचे आणि मुंबईकरांचे म्हणणे आहे. (potholes big Bollywood production houses Mumbai cast crew bmc Maharashtra government)

भारताची आर्थिक राजधानी असणारे शहर म्हणजे मुंबई. तसेच, स्वप्नांची नगरी म्हणूनही मुंबईला ओळखले जाते. भारतातील अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. परंतु, मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना करावा लागतो आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाय, अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे असतानाही मात्र याची कोणीच दखल घेत नसल्याचे सध्या दिसत आहे.

विशेष म्हणजे जगप्रसिद्ध बॉलिवुड कलाकार या मुंबईत आहे. काही मुंबईकर आहेत, तर काही आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. हे सर्व कलाकार मोठ-मोठ्या अलिशान गाड्यांमधून फिरतात. मात्र, यांच्यापैकी एकही कलाकार या खड्ड्यांबाबत कमेंट किंवा काहीच बोलत नाही, असे बोलले जात आहे.

अंधेरी पश्चिमच्या जवळपास 4 किलोमीटर परिसरात चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. या मार्गावरून नेहमी बॉलिवुडचे दिग्गज कलाकार म्हणजेच हृतिक रोशन, राकेश रोशन, भूषण कुमार, एकता कपूर, आदित्य चोप्रा आणि करण जोहर हे प्रवास करत असतात. मात्र, यांच्यापैकी कोणीही रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत कधीही ट्विट करत नाहीत किंवा बोलत नाहीत.

मुंबईत बऱ्याच ठिकाणी कलाकार राहत असून, त्यांच्या परिसरातही खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यानुसार, जुहू सर्कल ते सिटी मॉल पर्यंतचा परिसर, डीएन नगर मेट्रो स्टेशन ते सिटी मॉलकडे जाणाऱ्या लिंक रोडवर बरेच खड्डे आहेत. देशातील 2 सर्वात मोठी प्रॉडक्शन हाऊस टी मालिका आणि यश राज प्रॉडक्शन कार्यालये लक्ष्मी औद्योगिक वसाहतीच्या दुसर्‍या बाजूला असून, या भागातही मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.


हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती