घरठाणेठाणे जिल्ह्यात इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

ठाणे जिल्ह्यात इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

Subscribe

ठाणे (सुनील जावडेकर) – उल्हासनगर,दि,22-आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात मानस टॉवर या इमारतीच्या 5 व्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावरील दुकानावर कोसळला आहे.त्यात 4 माणस दगावली असून त्यामध्ये एका कुटुंबातील 3 जणांचा समावेश आहे.मागच्या वर्षी स्लॅब कोसळून 12 तर यावर्षी 6 जणांचा बळी गेल्यावरही महाराष्ट्र शासन तोडगा काढत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मानस टॉवर ही इमारत कॅम्प नंबर 5 मध्ये आहे.ही इमारत जुनी असल्याने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून 15दिवसात अहवाल सादर करण्याच्या नोटिसा शहर अभियंता व प्रभाग अधिकारी यांनी मे आणि जुलै महिन्यात बजावल्या होत्या.मानस टॉवर मध्ये 20 फ्लॅट असून तीन दुकाने आहेत.20 पैकी 10 फ्लॅट खाली होते.

- Advertisement -

साडेबारा वाजण्याच्या सुमारास मानस टॉवर मधील स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,सहायक आयुक्त गणेश शिंपी,अजित गोवारी,दत्तात्रय जाधव,तुषार सोनवणे,अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांनी घटनास्थळी धाव घेतली.ढिगाऱ्याखाली माणसं दबल्याने बचावकार्य सुरू करण्यात आले.इमारतीला खाली करण्याची प्रक्रिया हाताळली गेली.रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आल्यावर ढिगारा काढण्याच्या कामास गती मिळाली.

ढिगाऱ्या खालून सागर ओचानी(19),रेणू धोलानदास धनवानी(55),धोलानदास धनावनी(58)
प्रिया धनवानी(24) या चौघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.मृतकात पतीपत्नी व मुलीचा समावेश आहे.
मागच्या वर्षी मोहिनी पॅलेस आणि साईशक्ती या दोन इमारतींचे स्लॅब कोसळून 12 निरपराध नागरिकांचा जीव गेला होता.त्यानंतर मागच्याच महिन्यात 25 ऑगस्ट रोजी कोमल पार्क या इमारतीचा स्लॅब कोसळून त्यात बिगारीचा मृत्यू झाला होता. तर या महिन्यातच साईसदन या इमारतीचा सज्जा शेजारच्या घरावर कोसळल्याने त्याखाली गोपाळदास गाबरा यांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

उल्हासनगर शहरात अनेक इमारती मेंटेनन्स अभावी कमकुवत होत आहेत. बहुतांश ठिकाणी सहकारी सोसायट्या नसल्याने इमारतीतील रहिवाशी इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न करत नाहीत.नागरिकांनी आपली जिवितहानी टाळण्यासाठी इमारत देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे.तरीही नागरिक जीव धोक्यात घालून अशा इमारतीत राहत आहेत.नागरिकांनी आपल्या इमारतीचे संरचना अभियंता यांच्या कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात असे आवाहन आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -