घरमुंबईपुणे-मुंबई-पुणे धावणारी 'ही' एक्सप्रेस पाच दिवस रद्द

पुणे-मुंबई-पुणे धावणारी ‘ही’ एक्सप्रेस पाच दिवस रद्द

Subscribe

खंडाळा येथे मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

येत्या बुधवारपासून पुणे-मुंबई-पुणे या दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस उद्या १६ ऑक्टोबरपासून रविवारी २० ऑक्टोबरपर्यंत धावणार नाही. खंडाळा येथे मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. त्यातच प्रगती एक्स्प्रेस ५ दिवस बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

या गाड्याही रद्द करण्यात आल्या

मेगाब्लॉकमुळे प्रगती एक्स्प्रेससह अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. यामुळे मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर १७ ते १९ ऑक्टोबर, मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर १५, १६ आणि २० ऑक्टोबरला, पनवेल-नांदेड स्पेशल गाडी २० ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

या गाड्यांच्या मार्गात बदल

कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस १५ ते २० ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर अशी धावणार आहे. हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी एक्स्प्रेसही १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान पुण्यापर्यंत धावणार आहे. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान पुण्यातून हैदराबादला रवाना होईल. पनवेल-नांदेड एक्स्प्रेस १७, १८, १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी पनवेलऐवजी पुण्यातून नांदेडसाठी धावेल. नांदेडहून येणारी गाडी पुण्यापर्यंतच धावेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -