घरमुंबईमोदींनी शेतकऱ्यांप्रती भावूकपणा दाखवावा- अजित पवार

मोदींनी शेतकऱ्यांप्रती भावूकपणा दाखवावा- अजित पवार

Subscribe

सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात येईल.

नाशिक विभागाच्या वित्त नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिकमधील सर्व विभागांना योग्य निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. दरवर्षी सर्व विभागांना चांगला निधी देतो परंतु मागील वर्षी कोरोनामुळे टॅक्स रुपात राज्यातून येणारा तसेच केंद्रातून येणारा निधीवर विपरित परिणाम झाला आहे. असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी आंदोलनजीवी प्रश्नावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावरुन अजित पवारांनी उत्तर दिले की, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांप्रती भावूकपणा दाखवावा असे अजित पवार म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सभेत गुलाब नबी आझाद यांच्याविषयी बोलताना भावूक झाले होते. म्हणून अजित पवारांनी मोदींना टोला लगावला आहे.

शेतकरी मागील ३ महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीतही आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांची मागणीही काही अवाजवी नाही आहे. त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळावे अशी आपेक्षा आहे. अनेक चर्चा झाल्या परंतु त्या निष्फळ ठरल्या असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांसोबत बैठका होत असून निष्फळ ठरत असतील तर आपल्याला जरा पुढे मागे सरकून समजून घेतले पाहिजे आणि तशी तयारीही दाखवली पाहिजे. अशी राज्य सरकारचीही मागणी आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आमचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरलेले तुम्ही पाहिले आहेत. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाब नबी आझाद यांच्याविषयी व्यक्त होताना राज्यसभेत भावूक झाले. गुलाब नबी आझाद आणि मोदींचे पहिल्यापासून चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीतही मोदींनी भावूकता दाखवावी असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -