प्रियंका चतुर्वेदींनी ट्विट केला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Priyanka Chaturvedi responds to Raj Thackeray's video by tweeting the video
Priyanka Chaturvedi responds to Raj Thackeray's video by tweeting the video

राज्यात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरचावाद सुरू आहे. ठाकरे सरकार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या वादावरून समोरा समोर आले आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. याला खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यातील नमाज थांबवली जातील, कारण धर्म असा असावा की, त्यामुळे देशाच्या विकासात अडथळा येणार नाही. जर आपला हिंदू धर्म अडथळा निर्माण करत असेल तर मला सांगा. मी याकडे लक्ष देईन. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले जातील, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले आहेत.

या व्हिडिओला उत्तर देताना प्रियांका चतुर्वेदी यांनी हा मूळ व्हिडिओ आहे. हे स्वस्तात नकल करणाऱ्यांसाठी एक धडा आहे. कॉपी करणारे नेहमीच एक पाऊल मागे नसून अनेक पावले मागे असतात, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, मला कोणीतरी माझ्या स्टाइलमध्ये बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमचा शैली ठीक आहे, पण तशा पद्धतीची तुमची विचारधारा आहे का? नुसती मराठीमराठी बोंब मारून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता, असे बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.