घरमुंबईसावधान! मुलांभोवती स्किझोफ्रेनियाचा ऑक्टोपस

सावधान! मुलांभोवती स्किझोफ्रेनियाचा ऑक्टोपस

Subscribe

आजही लोकांमध्ये मानसिक आजारांबाबत तितकीशी जागृती नाही. त्यामुळे, प्रत्येक ट्रिटमेंट रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. तसंच या आजाराविषयी जाणून घेण्यासाठीही रुग्णाने मानसोपचारतज्ज्ञांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचे मत डॉ. शुभांग पारकर यांनी व्यक्त केले आहे.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे एनसीडी म्हणजेच संसर्गजन्य नसलेल्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. अशा आजारांवरील उपचारांचा खर्च ही मोठ्या प्रमाणात असतो. त्यात नैराश्य, ऑटिझम, डायमेंशिया, बायोफ्लोर, डिप्रेशन, न्यूरोटीक, स्क्रिझोफेनिया असे न माहित असलेले आजार जडतात. त्यामुळे या सर्व मानसिक आजारांबाबत माहिती आणि जनजागृती आणखी वाढली पाहिजे असं मत केईएम रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी ‘माय महानगर’कडे व्यक्त केलं आहे.

केईएम रुग्णलयात उपचारानंतर सुधारणा

१४ वर्षीय राकेश आव्हाड या मुलाला गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून पाठीवर कोणीतरी बसलं असल्याचा भास होत होता. त्यामुळे तो सतत पाठ वाकून चालायचा. पण, नंतर कळलं की, याला मानसिक आजार असून या आजाराला Early Psychosis schizophrenia म्हणजेच अरली सायकोसिस स्क्रिझोफेनिया असं म्हणतात. पण, हा असा कोणता तरी आजार आहे याबद्दल त्याच्या कुटुंबियांना माहितही नव्हतं. या मुलावर परळच्या केईएम रुग्णालयात महिनाभर उपचार सुरू होते. आता या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे.

- Advertisement -

लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले

सध्या Early Psychosis schizophrenia हा आजार लहान वयातच मुलांना जडतो आहे. ही मुलं अचानक वेडं वाकडं वागतात. तसंच अभ्यास देखील करत नाही. एकाकी राहणं ही मुलं पसंद करतात. त्यासोबतच त्यांच्या वागण्यात विचित्रपणा जाणवतो आणि वागणूकीत ट्रान्सफेशन आढळून येतात.

असा वागत होता हा मुलगा

या मुलाविषयी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा शाळेत जातो. पण, जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये आला तेव्हाही तो पाठीवर कोणीतरी असल्यासारखे वाकवूनच चालत होता. या मुलामध्ये अचानक झालेला हा बदल त्याच्या कुटुंबियांसाठी ही नवा होता. हा मुलगा पाठीवर कोणीतरी बसलं आहे असचं मानून त्या व्यक्तीशी गप्पा मारायचा, जेवायला बसल्यावर पाठीवरून त्या व्यक्तीला खाली बसवून त्याला विविध गोष्टी सांगत जेवण देखील भरवायचा. मुलामध्ये झालेला हा बदल पाहून कुटुंबियांच्या चिंतेत वाढ झाली होती. हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी आधी ५ ते ६ महिने या मुलाचे आई-वडिल त्याच्यावर जादूटोणा करण्यासाठी घेऊन गेले होते. पण, जेव्हा त्यांना कळलं की, हा मानसिक आजार आहे तेव्हा त्यांनी केईएममध्ये दाखल केलं.

- Advertisement -

कोणी तरी असल्याचा व्हायचा भास

त्यानंतर, केईएम हॉस्पिटलमधील मानसोपचार विभागात या मुलाच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. या चाचणी अहवालात मुलाला Early Psychosis हा मानसिक आजार असल्याचं निदान झालं. याविषयी केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितलं की, हा मुलगा जेव्हा इथे आला तेव्हा तो पाठीवर कोणीतरी बसलं आहे असाच वागत होता. तो चालायचा ही तसाच. तो सतत त्याच्याशी बोलायचा. आई-वडिलांशी भांडण करायचा अशी देखील तक्रार त्याच्या कुटुंबियांनी केली होती. त्यानंतर त्याच्या काही तपासण्या केल्या. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की, त्याला सतत भास होत आहे. याला सायकोसिस स्क्रिझोफेनिया असं म्हणतात.”

” सध्या मुंबईसह उत्तरप्रदेशहून अधिक मानसिक आजाराने त्रस्त झालेले रुग्ण येत आहेत. दिवसाला ३५ नवीन केस येत आहेत. त्यासोबतच १७० हे फॉलो अपचे रुग्ण असतात. या रुग्णांची समस्या समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यांच्याशी बोलावं लागतं. अशा रुग्णांवर औषधांची ट्रिटमेंट केली जाते. हा मुलावर एक महिना उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजही लोकांमध्ये मानसिक आजारांबाबत तितकीशी जागृती नाही. त्यामुळे, प्रत्येक ट्रिटमेंट रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. तसंच या आजाराविषयी जाणून घेण्यासाठीही रुग्णाने मानसोपचारतज्ज्ञांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्यातील होणाऱ्या बदलांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञांकडे दाखवलं पाहिजे. ” – डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभागाच्या प्रमुख , केईएम रुग्णालय

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -