घरमुंबईदेशात 'आयआयटी मुंबई' सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थानावर

देशात ‘आयआयटी मुंबई’ सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थानावर

Subscribe

सलग दुसऱ्यांदा पवईतील आयआयटी मुंबई हे 'क्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२०' क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत सलग दुसऱ्या पवईतील आयआयटी मुंबई सर्वोत्तम ठरली आहे. नुकतीच ‘क्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२०’ ची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत टॉप टेन मध्ये देशातील आणखी सहा आयआयटी संस्थांनी स्थान मिळवले आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’ या बंगळुरूमधील विद्यापीठाने दुसऱ्या क्रमांकावर स्थान प्रस्थापित केलं आहे. या क्रमवारीत आयआयटी दिल्लीने तिसरे, आयआयटी मद्रासने चौथे, आयआयटी खगरपूरने पाचवे, आयआयटी कानपूरने सहावे, आयआयटी रुरकीने नववे आणि आयआयटी गुवाहाटीने दहावे स्थान पटकावले आहे.

दिल्लीतील आयआयटी हे मागील वर्षी चौथ्या क्रमांकावर होते तर यंदा या विद्यापीठाने तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. तसंच आयआयटी मद्रासची एक क्रमांकाने घसरण झाली आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग २०१९’ ही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तयार केली होती. यामध्ये आयआयटी मद्रास पहिल्या क्रमांकावर होती तर आयआयटी मुंबई ही चौथ्या क्रमांकावर होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -