घरमुंबईउंदीर-घुशी आल्या पळा पळा, बेस्ट समिती सदस्यांची पळताभुई थोडी

उंदीर-घुशी आल्या पळा पळा, बेस्ट समिती सदस्यांची पळताभुई थोडी

Subscribe

कुलाबा येथील बेस्ट समितीचा सभागृहात उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे. बेस्ट सदस्यांची बैठक सुरू असताना उंदीर-घुशी त्यांच्या पायात घुसतात. अंगावर चढतात. त्यामुळे त्यांची पळताभुई थोडी होेते. काही वेळा खुर्च्यांवर पाय घेऊन बसावे लागते.

कुलाबा येथील बेस्ट समितीचा सभागृहात उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे. बेस्ट सदस्यांची बैठक सुरू असताना उंदीर-घुशी त्यांच्या पायात घुसतात. अंगावर चढतात. त्यामुळे त्यांची पळताभुई थोडी होेते. काही वेळा खुर्च्यांवर पाय घेऊन बसावे लागते. काही सदस्य तर त्यांच्या भीतीमुळे जागच्या जागी उडी मारतात. उंदीर पायांना चावे घेतात. त्यामुळे सदस्यांनी चपला घालणे सोडून दिले आहे.

पायांच्या सुरक्षेसाठी ते आता बूट घालतात. या उंदराच्या तावडीतून वार्तांकन करणारे पत्रकारही सुटलेले नाहीत. त्यामुळे बेस्ट समितीच्या सभागृहात उंदरांची प्रचंड दहशत पसरलेली आहे. कुलाबा येथील बेस्ट भवनच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहमध्ये मागील दोन महिन्यापासून उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पावले उचलली जात नाहीत.

- Advertisement -

त्यामुळे बेस्ट समितीच्या सदस्यांच्या आरोग्यासोबत जीवालाही मोठा धोका निर्माण झालेला आहे. बेस्ट समिती सदस्यांची महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना अचानक उंदरांचे आगमन होत आणि ते सदस्यांच्या पायात घुसतात. बेस्ट समिती सदस्य राजेश कुसळे उंदीर आणि घुशींच्या दहशतीमुळे बूट घालून येतात. केवळ बेस्टच्या सभागृहातच नव्हे तर संपूर्ण कार्यालयात उंदीर आणि घुशींचा सुळासुळाट झाल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाले आहेत. या संबंधित बेस्ट अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

एका बेस्ट अधिकार्‍याने नाव न छापण्याचा अटीवर माहिती देताना सांगितले की, बेस्ट समिती सभागृह उंदीर आणि घुशींचा बंदोबस्त करण्यासाठी बेस्टच्या वेल्फेअर विभागाकडून पालिकेला नेहमीच तक्रार करीत असते. मात्र त्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे उंदीर आणि घुशींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे पालिका मागील ६ महिन्यात २ लाख ११ हजार ६०७ उंदीर ठार मारल्याचा दावा करीत आहे. पण त्यांच्याच अखत्यारितील बेस्ट भवनातील उंदीर आणि घुशींवर नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे पालिका आणि बेस्टविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

 

बेस्ट समितीच्या सभागृहात महत्वाची चर्चा सुरू असताना उंदीर आणि घुशी बेस्ट सदस्यांचा पायावर फिरत असतात. त्यामुळे आम्ही बेस्ट समितीच्या सभेत चप्पल घालणे सोडून बूट घालण्यास सुरुवात केली आहे. बेस्ट प्रशासनाने यात लक्ष घालून सभागृहातील उंदीर आणि घुशींचा नायनाट करावा.

– राजेश कुसळे, बेस्ट समिती सदस्य.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -