घरमुंबईनवी मुंबई महानगरपालिकेत १६९ पदांसाठी भरती

नवी मुंबई महानगरपालिकेत १६९ पदांसाठी भरती

Subscribe

तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात? नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 169 पदांवर भरती करायची आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी अशा पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय तज्ज्ञ पदासाठी D.M./M.C.H./M.S./M.C.H./ DNB यापैकी एक शैक्षणिक पात्रता हवी.
वैद्यकीय अधिकारी पदासाठी M.D./ M.S./ B.D.S./MBBS/DM् यापैकी एक शैक्षणिक पात्रता हवी.

- Advertisement -

वयाची अट
1 जुलै 2019 रोजी 38 वर्षापर्यंत वय असलेले अर्ज करू शकतात. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट आहे.
अर्जाची फी उमेदवाराला 300 रुपये अर्जाची फी द्यावी लागेल. मागासवर्गीयांसाठी ही फी 150 रुपये आहे.
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रशासन विभाग, आस्थापना शाखा क्र.1, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू.क्र.1, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15 A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 किंवा ईमेल: [email protected]

- Advertisement -

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2019. शिवाय तुम्ही https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या वेबसाइटवर अधिक माहिती मिळवू शकता.

वैद्यकीय व्यवसायात बर्‍याच संधी असतात. सगळेच जण काही स्वत:ची डिस्पेन्सरी उघडू शकत नाहीत. असे डॉक्टर्स उमेदीच्या काळात पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकतात.त्यामुळे त्यांना अनुभवही मिळतो. तिथे डॉक्टर्सची जास्त गरज असते. अशा नोकर्‍यांमध्ये करियरची उत्तम संधी मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -