घरमुंबईRED Alert! येत्या ४८ तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

RED Alert! येत्या ४८ तासांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Subscribe

येत्या २४ तासांत राज्याच्या ५ जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज

बुधवारपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दैना झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईत शाळा आणि महाविद्यालयं २ बंद ठेवण्यात आली असून त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धुव्वाधार पावसाने विस्कळीत झालेलं मुंबईकरांचे जीवन पूर्वपदापवर येत आहे. ४८ तासांहून अधिक पावसाची सतंतधार सुरू असल्याने मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मध्य, हार्बर आणि पश्मिच रेल्वे मार्गांवर याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता तब्बल १२ ते १४ तासांनंतर रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर येत आहे.

मंगळवारी मध्यरात्री पासूनच मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार आणि कर्जत ते कसाऱ्या दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावली. संपुर्ण सप्टेंबर महिन्याचा पाऊस हा दोन दिवसातच कोसळला असून या दोन दिवसात तब्बल ४०३ मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

बुधवार आणि गुरूवार या दिवशी हवामान खात्याने अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. येत्या २४ तासांत राज्याच्या ५ जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. तर आज गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुण्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापुरात ऑरेज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

- Advertisement -

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर ४ वाजून १२ मिनिटांनी हाय टाईड असल्याचे सांगण्यात येत असल्याने समुद्रात वाऱ्याचा वेग अधिक वाढणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -