घरमुंबईठाणे जिल्ह्यात नवरी मिळेना नवऱ्याला!, मुलींच्या अपेक्षा वाढल्या

ठाणे जिल्ह्यात नवरी मिळेना नवऱ्याला!, मुलींच्या अपेक्षा वाढल्या

Subscribe

ठाणे जिल्ह्यात लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे समोर आले आहे.

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा समाजाच्या या मानसिकतेतून स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण वाढीस लागली. या वाढीस लागलेल्या प्रवृत्तीने मुले आणि मुली यांचा समाजातील समतोल बिघडला आहे. ठाणे जिल्ह्यात आणि राज्यात ‘नवऱ्याला मिळेना नवरी’, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत विवाह संस्था संचालक नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे. मुलींच्या आशा अपेक्षा मोठ्या असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘बेटी बचाव’ या संकल्पनेला यश

ठाणे जिल्ह्यात “बेटी बचाव” या संकल्पनेला काही प्रमाणात का होईना यश आले आहे. राज्यात मात्र, अजूनही परिस्थिती ही तेवढी सुधारलेली नाही. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केंद्र शासनाच्या या योजनेची अंमलबजावणी करून यश मिळवले आहे. जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या कार्याची दाखल घेत केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन पात्र पाठवून केले आहे. ठाणे जिल्ह्यात मुले आणि मुली यांच्या जन्माच्या नोंदीत २०१७-२०१८ या वर्षात एक हजार मुलांच्या जन्माच्या बरोबरीने मुलीची संख्या ९४९ होती. तर सन २०१८-२०१९ या वर्षात मुलींच्या जन्माची संख्या ९६० इतकी झाल्याचे सरकारी आकडेवारीने समोर आले आहे. मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या ही कमी असल्याने याचा परिणाम विविध समाजातील कुटुंबावर होत आहे. शिकलेल्या मुलाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे मुलगी मिळेना आणि शिक्षित मुलीच्या अपेक्षेप्रमाणे मुलगा मिळणे मुश्किल झाल्याने “नवरी मिळेना नवऱ्याला आणि नवरी मिळेना नवऱ्याला”, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

- Advertisement -

ठाण्यातील विवाहसंस्थेचा जनजागृतीचा फंडा

ठाण्यातील अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज ठाणे या विवाहसंस्थेला या विषमतेचा अनुभव आणि फटका जाणवला. सध्याची परिस्थिती आणि मुलं-मुलीच्या जन्माची टक्केवारीने अनेक कुटुंबात विवाहासारखी गोड बातमी अपेक्षेप्रमाणे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे परिस्थितीला अनुकूल, असा जनजागृतीचा फंडा विवाह संमेलनामध्ये येणाऱ्या मुले-मुली आणि त्यांच्या पालकांना प्रबोधन करण्यात येत आहे. मारायचे सर्वांना असते, पण मरावं असे कुणाला वाटत नाही, अन्न सर्वानाच हवे आहे, पण शेतकऱ्यांशी लग्न करावे, असे कुणालाच वाटत नाही, सून सर्वांनाच हवी आहे, पण मुलगी व्हावी, असे कुणालाच वाटत नाही अशा वास्तविकतेचे प्रबोधन करून विवाह संस्था चालविणारे संचालक नंदकुमार देशमुख करीत आहेत.

समाजातील प्रगती आणि प्रवृत्ती आडवी येत आहे. ग्रामीण भागातील मुलीशी लग्न करण्यास शहरातला मुलगा तयार नाही, तर उच्च शिक्षण घेतलेल्या मुली या कमी शिकलेल्या आणि कमी पगार असलेल्या मुलासोबत लग्न करण्यास तयार नसल्याने वर्षानुवर्षे ही मुले आणि मुली विवाह संस्थेत अपेक्षित स्थळासाठी फेऱ्या मारीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सध्या मुलींचा जन्म याची टक्केवारी कमी असली तरीही शिक्षणात मुलींचे वर्चस्व आहे. त्या प्रमाणात मुलांचे वर्चस्व नसल्याने आणि मुलींची कमतरता जाणवत असल्याने आज ठाण्यासारख्या शहरात “नवरी मिळेना, नवऱ्याला” अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

- Advertisement -

मागच्या ३० वर्षांपासून विवाह संस्था चालवीत आहे. मराठा समाजासह लोकांच्या वाढत्या मागणीमुळे सर्वच समाजाच्या विवाह संस्था सुरु केली आहे. मुलगी उच्चशिक्षित असली कि अपेक्षेप्रमाणे वेतन असलेला सरकारी अधिकारी मिळत नाही. तर कमी शिकलेल्या मुलीची अवस्थाही काही वेगळी नाही. या मुली सरकारी नोकरी आहे काय? स्वतःचे घर आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. सरकारी नोकरी उपलब्ध नाही. पण प्रत्येक शिक्षित आणि कमी शिकलेल्या मुलींना सरकारी नोकरी हवी आहे. त्यामुळे मुली शिक्षण घेऊनही अनेक वर्ष अपेक्षित स्थळ शोधात राहतात आणि कालांतराने समझोता करीत विवाह करतात, अशी परिस्थिती आहे. त्यातच मुलींच्या जन्माची आकडेवारी वाढविणे गरजेचे आहे. समाजातील मुले-मुलीने आणि पालकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात ही समस्या जातील आणि सामाजिक होईल.  – नंदकुमार देशमुख; अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज विवाह संस्था, ठाणे


हेही वाचा – खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -