घरमुंबईभातसा धरणाच्या उजव्या तीर कालव्याची दुर्दशा

भातसा धरणाच्या उजव्या तीर कालव्याची दुर्दशा

Subscribe

कालवा फुटून शेतीच्या नासाडीची शेतकर्‍यांना भीती

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर भातसा धरणाला जोडलेल्या उजव्या तीर कालव्याची देखभाल दुरुस्ती अभावी आता प्रचंड दुरवस्था झाली आहे. पडझड झालेल्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून गेली अनेक वर्ष निधीच मिळत नसल्याने मागील १४ वर्षात या कालव्याला अनेक ठिकाणी लहान मोठी भगदाड पडली आहेत. त्यातून बर्‍याच ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. निधी अभावी कालवा दुरुस्तीचे प्रस्ताव ठाणे जलसंपदा विभागाकडे पडून आहेत.

भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालव्याची लांबी एकूण 67 किलोमीटर आहे. यातील 54 किलोमीटरपर्यंत उजव्या कालव्याचे काम झाले आहे. उर्वरित काम वन विभागाच्या जागेच्या अडचणीमुळे अपूर्ण अवस्थेत आहे. जो कालवा सध्यस्थितीत आहे. या कालव्यातून सिंचनासाठी दिल्या जाणार्‍या पाण्यामुळे शहापूर व भिवंडी तालुक्यातील 108 गावांतील जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. या शेत जमिनीसाठी दरवर्षी जलसंपदा विभाग उन्हाळी मोसमात शेती व भाजीपाला लागवडीसाठी या कालव्यातून डिसेंबर अखेरीला सिंचन म्हणून पाणी पुरविते. या पाण्याच्या मोठा अधार शेतकर्‍यांना उन्हाळ्यात असतो. मात्र, हा कालवा आता शेतकर्‍यांनाच्या मुळावर उठला आहे. हा कालवा केव्हा फुटेल आणि शेतीचे नुकसान करून भातपिके व भाजीपाला यांची नासाडी करेल याची शाश्वती कोणालाच देता येत नाही. पडझड झाल्याने कालवा फुटेल या भीतीच्या छायेखाली शहापूर भिवंडीचे शेतकरी आहेत. सिंचनासाठी पाणी मिळत असले तरी या कालव्याची योग्य देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेवर न झाल्याने कालव्यास लहान मोठी भगदाड पडली आहेत, तर बर्‍याच ठिकाणी कालव्याचे जुने सिमेंट काँक्रिट आता जीर्ण होऊन ढासळत चालले आहे. पडझड झालेल्या कालव्यातून रोज हजारो लिटर्स पाण्याची गळती होते आहे.

- Advertisement -

कालव्याच्या दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याचे दरवर्षी जलसंपदा विभागाच्या ठाणे अधीक्षक अभियंत्यांना पत्रव्यवहार करून कळविले जाते. याकरता संबंधित कालवा दुरुस्ती कामांची अंदाजपत्रक तसेच सुची पाठवली जाते. मात्र, या कामांसाठी निधी नसल्याची कारणे पुढे केली गेल्याने दुरुस्तीचे काम अद्याप झालेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -