Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Remdesivir Black Market: गोरेगावच्या हॉटेलमधील स्वयंपाक घरातून रेमडेसिवीरची विक्री, हॉटेलवर पोलिसांचा छाप...

Remdesivir Black Market: गोरेगावच्या हॉटेलमधील स्वयंपाक घरातून रेमडेसिवीरची विक्री, हॉटेलवर पोलिसांचा छाप २६ इंजेक्शन जप्त

हॉटेलच्या स्वयंपाकघरातून रेमडेसिवीर इंजेक्शनाच्या २६ बाटल्या जप्त

Related Story

- Advertisement -

मुंबईसह राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल झाले तर अनेकांना जिव गमवावा लागला. रेमडेसिवीर इंजेक्शनाबाबतील काळाबाजार झाल्याचे अनेकदा उघड झाले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच जास्त किंमतीत विकले जात आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीसांची फौज तैनात करण्यात आली आहे. मुंबईच्या गोरेगाव भागातून रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या हॉटेलवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी केली आहे. या छापेमारीत हॉटेलच्या स्वयंपाकघरातून रेमडेसिवीर इंजेक्शनाच्या २६ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. काळाबाजार करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.


गोरेगावच्या मोतीलाल नगर येथे असलेल्या हॉटेलवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी केली. हॉटेलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचे कळताच पोलिसांनी हॉटेलवर छापेमारी केली तेव्हा चक्क हॉटेलच्या स्वयंपाक घरातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचे उघड झाले. हॉटेलच्या स्वयंपाकघरातून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या २६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण ५ जण मिळून एक रेमडेसिवीर इंजेक्शन २० ते २५ हजारांना विकत असल्याचे समोर आले आहे. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आकांत तांडव केला जात आहे. अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबईप्रमाणे अनेक ठिकाणी पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उधळून लावला आहे. पैसे कमावण्याच्या नादात रुग्णांच्या जीवशी खेळ सुरु आहे.


हेही वाचा – वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisement -