घरमुंबईमुंबईतल्या खड्ड्यांची नोंद गिनीज बुकात होणार?

मुंबईतल्या खड्ड्यांची नोंद गिनीज बुकात होणार?

Subscribe

मुंबईतील खड्डे चर्चेचा विषय बनला आहे. या खड्ड्यांचा मुद्द्यावरुन राजकीय आणि सामाजिक स्तरावर खड्ड्यांमुळे मोठ्याप्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे. या खड्ड्यांची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी यासाठी मुंबईतील एका नागरिकाने अर्ज केला आहे.

मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाला की रस्ते खड्डेमय होतात. या खड्ड्यांविरोधात अनेक राजकीय पक्ष आंदोलन करतात, तर काही पक्ष खड्ड्यांमध्ये रांगोळी काढतात, झाडे लावतात, अंत्ययात्रा देखील काढली जाते. मात्र हा खड्ड्यांचा मुद्दा कोणीच गांभीर्याने घेताना दिसत नाही. वर्षानुवर्ष मुंबईतील रस्ते आणि खड्डे हा चर्चेचा विषय बनतो. तरी देखील मुंबई महापालिका यावर कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. या खड्ड्यांमुळे अपघात होतात आणि यामध्ये अनेक जणांचा नाहक बळी जातो. त्यामुळे मुंबईतील या खड्ड्यांची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी यासाठी आरपीआयचे महाराष्ट्र सरचिटणीस नवीन लादे यांनी अर्ज केला आहे.

खड्ड्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार चर्चा

मुंबई शहर हे अपघातांचे शहर बनले आहे. या ठिकाणी दररोज कुठे ना कुठे अपघाताच्या घटना घडत असतात. यामधील एक म्हणजे मुंबईतील खड्ड्यांमुळे होणारे अपघात! गेल्या काही वर्षांपासून खड्ड्यांमुळे मृतांचा आकडा वाढला आहे. यावर मुंबई महानगरपालिका काहीच करताना दिसत नाही. जर हे खड्डे गिनीज आणि लिमका बुकमध्ये गेले तर यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होईल. त्याचा कुठेतरी प्रभाव प्रशासनावर होईल आणि त्यामधून मुंबई खड्डेमुक्त होईल, असे नवीन लादे यांना वाटले. त्यामुळे त्यांनी थेट या खड्ड्यांची नोद गिनीज बुक आणि लिमका बुकमध्ये व्हावी यासाठी नोंदणी केली आहे.

- Advertisement -

मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय

नवीन लादे यांनी यासंदर्भात त्यांच्या फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवरुन मुंबईकरांना आवाहन केले. ‘मुंबईकरांनी त्यांच्या भागातील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवा’ असे नवीन लादे यांनी सांगितले. मुंबईकरांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईकरांनी त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, रस्त्याचे नाव, खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ नवीन लादे यांना पाठवले. जवळपास शेकडो खड्ड्यांचे फोटो लादे यांच्याकडे आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

खड्ड्यांचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरु

गिनीज बुक आणि लिमका बुकमध्ये मुंबईच्या खड्ड्यांची नोंद करण्यासाठी नवीन लादे यांनी ५ डॉलर खर्च केले आहेत. पुढच्या तीन महिन्यांमध्ये त्यांना मुंबईतील खड्ड्यांचे फोटोसहीत पुरावे द्यायचे आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबई महानगर पालिकेमध्ये देखील आरटीआय टाकला आहे. यामध्ये त्यांनी मुंबईतील खड्डे आणि त्यामुळे झालेल्या मृतांचा आकडा मागवला आहे. सध्या ते सर्व पुरावे जमा करत असून काही दिवसांत हे सर्व पुरावे ते गिनीज बुकसाठी देणार आहेत.

- Advertisement -

‘मुंबई खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत प्रयत्न करणार’

गिनीज बुककडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर नवीन लादे हे प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या नावाने त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. जोपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसंदर्भात दरवर्षी गिनीज आणि लिमका बुकमध्ये याची नोंदणी करणार असल्याचे नवीन लादे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले.

अधिक वाचा – 

सायन-पनवेल रस्त्याची दुर्दशा, १७०० कोटी; खड्ड्यात‘आपलं महानगर’ टिमचा धक्कादायक अनुभव
मुंबई​त आद्यापही ३५८ खड्डे, कंत्राटदारांना उद्या पर्यंतची मुदत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -