घरमनोरंजनमधुकर तोरडमलांचा वारसा जपणार मुलगी तृप्ती

मधुकर तोरडमलांचा वारसा जपणार मुलगी तृप्ती

Subscribe

‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृ्प्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या‘सविता दामोदर परांजपे’या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम करत आहे.

मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडीलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात,तेव्हा आई-वडीलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृ्प्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या‘सविता दामोदर परांजपे’या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम करत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाद्वारे जॅानची पावलं मराठीकडे वळण्यासाठीही तृप्तीच कारणीभूत आहे. तृप्तीला मराठी सिनेमाची निर्मिती करायची होती. स्वप्ना वाघमारे यांची जशी ती मैत्रीण आहे,तशीच जॅानचीही आहे.

जॅानसोबत तृप्तीचे घरगुती ऋणानुबंध आहेत. जॅानला मराठी सिनेमा करायचा होताच. जेव्हा‘सविता दामोदर परांजपे’या नाटकाबद्दल आणि त्यावर आधारित असलेल्या सिनेमाबद्दल सांगितलं, तेव्हा तो स्वत:हून या सिनेमाच्या निर्मितीत सहभागी व्हायला तयार झाल्याचं तृप्तीचं म्हणणं आहे. खरं तर‘सविता दामोदर परांजपे’हा तृप्तीचा अभिनयातील पदार्पणाचा सिनेमा आहे,पण ती या सिनेमाबाबत खूप कॅान्फीडन्ट आहे. ती म्हणते की,पप्पांचा आशिर्वाद माझ्या मागे आहे. त्यामुळेच हे घडून आलं आहे. आज त्यांना जाऊन वर्ष होतं आहे,पण ते गेले असं वाटतच नाही. कदाचित मी अभिनय करावं असं त्यांना वाटत होतं,पण त्यांनी कधीच कोणतीही गोष्ट माझ्यावर लादली नाही. त्यामुळे ‘अभिनय कर’ असंही कधी म्हणाले नाहीत,पण त्यांच्या प्रेरणेमुळेच मी अभिनेत्री बनले आहे. शेखर ताम्हाणे यांच्या दिग्दर्शनाखाली १९८५ मध्ये मराठी रंगभूमीवर अवतरलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’या नाटकाने त्या काळातील प्रेक्षकांचा थरकाप उडवला होता. नाटकामध्ये राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाचं लेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. नाटकात रीमा लागूंनी साकारलेली भूमिका तृप्तीने साकारली आहे. तृप्तीच्या जोडीला सुबोध भावे आणि राकेश बापट, पल्लवी पाटील,अंगद म्हसकर,आणि सविता प्रभुणे या कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत. येत्या३१ ऑगस्टला‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

apurva chaudhari
अपूर्वा चौधरी

अपूर्वा चौधरीची’माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये एन्ट्री!

छोट्या पडद्यावरील लोकप्रीय मालिका’माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये अभिनेत्री अपूर्वा चौधरी हिची एन्ट्री झाली आहे.पुण्याच्या ललित कला केंद्राची विद्यार्थीनी असलेली अपूर्वा या मालिकेत प्रियांका नावाचे कॅरेक्टर करत आहे.या मालिकेतील सर्वांची लाडकी शनाया हिच्या घरामध्ये काम करणारी अवलिया मोलकरीण साकारत आहे.अपूर्वाचा पहिलाचा एपिसोड धमाकेदार झाला असून पुढे ती मालिकेत अशापद्धतीने मज्जा आणते याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
ललित कला केंद्र मधून नाट्यशास्त्राची पदवी घेऊन मुंबईत आल्यावर’सुसाट’ हेनाटक,’दुहेरी’हीमालिका,’क्राईम फाईल’,’क्राईम पेट्रोल’यात छोट्या मोठ्या भूमिका अपूर्वाने साकारल्या आहेत.अचानक तिला ‘माझ्या नवऱ्याची बायको’मालिकेकरता ऑडिशनसाठी बोलावण्यात आले आणि पहिल्याच प्रयत्नात अपूर्वाची निवड झाली.या भूमिकेबद्दल अपूर्वा सांगते की,जरी ही मोलकरणी भूमिका असली तरी धमाल विनोदी अशी आहे.शनायाला पुरून उरेल असा तिचा स्वभाव आहे,कानात हेडफोन घालून गाणे ऐकत काम करणे तिची सवय आहे.खरंतर प्रियांका वेगळाच हेतू घेऊन आली आहे.हे मालिका पाहतांना प्रेक्षकांना समजेलच.सर्वांसोबत काम करताना खूप मज्जा आली,कुणीही दडपण जाणवू दिले नाही.सगळ्यांप्रमाणे माझीही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मी अपेक्षा करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -