घरमुंबईसलमान खानला हायकोर्टाचा दिलासा; पत्रकाराला मारहाणीची तक्रार रद्द

सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा; पत्रकाराला मारहाणीची तक्रार रद्द

Subscribe

 

मुंबईः अभिनेता सलमान खान विरोधाताली पत्रकाराला मारहाणीची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. त्यामुळे सलमान खानला दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

२०१९ मध्ये ही घटना घडली होती. सायकल चालवत असताना सलमान पत्रकाराला धडकला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. याविरोधात पत्रकाराने महानगर दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली. या घटनेप्रकरणी सलमानविरोधात फौजदारी खटला दाखल करावा, अशी मागणी पत्रकाराने केली होती. या तक्राची दखल घेत न्यायालयाने डी. एन. नगर पोलिसांना या घटेनची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार डी. एन. नगर पोलिसांनी या घटनेचा अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारावर न्यायालयाने सलमानला हजर राहण्याचे आदेश दिले. याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही तक्रार रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने एप्रिल २०२२ मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सलमानच्या याचिकेवर सुनावणी झाली.

- Advertisement -

फोटो आणि व्हिडिओ बनवू नको असे पत्रकाराला सांगा एवढेच सलमानने त्याच्या बॉडीगार्डला सांगितले होते, असे वरीष्ठ वकील आबाद पौंडा यांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र घटना घडली तेव्हा सलमानने पत्रकाराला मारहाण केली होती. तशी तक्रारही पोलिसांत करण्यात आली, असे तक्रारदार पत्रकाराच्या वकीलाने न्यायालयाला सांगितले. मात्र सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने सलमानविरोधातील तक्रारच रद्द केली.

दरम्यान, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या ई-मेल आयडीवरून सलमानला धमकीचा मेल पाठवला गेला होता, हा यूकेमधील एका मोबाईल नंबरशी जोडलेला असल्याचं कळलं आहे. पोलीस सध्या हा नंबर ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदवला आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्याच आठवड्यात मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या कार्यालयात धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 506 (2) 120 (B)आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -