संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी देण्याची मागणी

Sambhaji Raje rejected Shiv Sena's offer to join the party
Sambhaji Raje rejected Shiv Sena's offer to join the party

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याचा माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संभाजीराजेंना शिवसेना पक्ष प्रवेशाचा निरोप मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आला होता.

पक्ष प्रवेशाचा निरोप –

उद्या दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावा, त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप मुख्यमंत्र्यांच्या वितीने खासदार संजय राऊत यांनी दिला होता. याबाबत त्यांनी फोनवरून संभाजीराजेंशी चर्चा केली होती. यानंतर संभाजीराजेंनी शिवसेनेची ही ऑफर नाकरल्याची माहिती मिळाली आहे.

मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करणार  –

शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशीही मागणी त्यांनी शरद पवारांकडे केली होती.