घरमुंबईशेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा स्थगित; उद्योगमंत्र्यांनी भेटीसाठी दिला वेळ

शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा स्थगित; उद्योगमंत्र्यांनी भेटीसाठी दिला वेळ

Subscribe

सातारा जिल्ह्यातील ५० शेतकरी १२ जानेवारीपासून खंडाळा येथील तहसिल कार्यालयापासून अर्धनग्न अवस्थेत पायी चालत मंत्रालयाकडे आले आहेत.

मुंबईमध्ये अर्धनग्न अवस्थेत आलेल्या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा अखेर स्थगित केला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी मोर्चा मागे घेतला आहे. या शेतकऱ्यांसोबत उद्या ११ वाजता उद्योगमंत्री चर्चा करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील खंडाळापासून अर्धनग्न अवस्थेत शेतकऱ्यांनी काढलेल्या या मोर्चाला मुंबईच्या वेशीवर म्हणजे मानखुर्द येथे येताच पोलिसांनी अडवले होते. दरम्यान आंदोलनकर्त्या काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते.

का काढला शेतकऱ्यांनी मोर्चा?

सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणुक झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन संपादित करताना दलालांना झुकते माप दिले गेले त्यामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सातारा जिल्ह्यातील केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मावशी, मोर्वे, भादे, अहिरे गावातील जवळपास ५० शेतकरी १२ जानेवारी पासून खंडाळा येथील तहसिल कार्यालयापासून अर्धनग्न अवस्थेत पायी चालत मंत्रालयाकडे आले. मात्र त्यांना मानखुर्द येथे पोलिसांनी अडवत ताब्यात घेतले.

- Advertisement -

उद्योगमंत्र्यांसोबत उद्या होणार चर्चा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिन संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. गेल्या १० वर्षापासून भूसंपादनाला शेतकरी विरोध करत असताना देखील आमच्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोर्चेकरी शेतकऱ्यांनी केला आहे. शेवटी या शेतकऱ्यांनी आपला आवाज मुंबईपर्यंत पोहचवण्यासाठी थेट मंत्रालयापर्यंत अर्धनग्न पायीमोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चाची दखल घेत शेवटी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोर्चा स्थगित केला आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

मंत्रालयावर धडकणार शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -