घरमुंबईराष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या 9 प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या 9 प्रकल्पांची निवड

Subscribe

मुलुंडमधील जे. जे. अकॅडमीचा प्रकल्प राज्यात अव्वल

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेत यावर्षी मुंबईला विक्रमी यश मिळाले आहे. मुंबईतील तब्बल नऊ प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यातही मुलुंडमधील जे.जे. अकॅडमी शाळेचा ‘परंपरागत घरगुती आरोग्य पेयांची निर्मिती’ हा विज्ञान प्रकल्प महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने निवडला गेला आहे.मागील 20 वर्षातील राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा हा मुंबईचा उच्चांक आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेत नुकतीच पुण्यातील बेल्हे येथील समर्थ इंजिनियरिंग कॉलेजमध्ये झाली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 84 प्रकल्प निवडले गेले होते. यामध्ये मुंबईतील 13 प्रकल्पांचा समावेश होता. महाराष्ट्रातून राष्ट्रीयस्तरासाठी 30 प्रकल्पांची निवड झाली आहे. यामध्ये मुंबईतील नऊ प्रकल्पांचा समावेश झाला आहे. मागील 20 वर्षातील राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा हा मुंबईचा उच्चांक आहे. गत पाच वर्षात मुंबईतून 4, 5, 8, 6, 8 असे 31 विज्ञान प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी निवडले गेले आहेत. त्यामुळेच मुंबई व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची गुणवत्ता असे एक समीकरण तयार झाले आहे.

- Advertisement -

बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईतून 301 विज्ञान प्रकल्प जिल्हास्तरावर सहभागी झाले होते. त्या प्रकल्पांचे सादरीकरण आणि परीक्षण माटुंगामधील श्री अमूलख अमीचंद हायस्कुलमध्ये झाले होते. यातून 20 प्रकल्पांची निवड राज्यपूर्व चाळणी स्तरासाठी झाली होती. या वर्षीची राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषद केरळ राज्यातील तिरुअनंतांपुरम येथे 27 ते 31 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुंबईच्या या निवडप्राप्त 9 शाळांचे प्रकल्पक विद्यार्थी महाराष्ट्राच्या 30 बालवैज्ञानिकांच्या चमुबरोबर 26 डिसेंबरला केरळला रवाना होणार आहेत. सर्व प्रकल्पांना शिक्षक प्रशिक्षण वर्गापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत बी. बी. जाधव यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

मुंबईतील उच्चांकी यशामागे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, बाल संशोधक विद्यार्थी, मुंबई शिक्षण विभाग आणि या उपक्रमाची मुंबईतील समन्वयक संस्था नवनिर्माण विज्ञान प्रबोधन यांची 20 वर्षांतील तपश्चर्या आहे.
– बाळासाहेब बी जाधव, मुंबई विभाग प्रमुख, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद

- Advertisement -

निवड झालेल्या शाळा
बोरिवली शेठ जी. एच. हायस्कुल, आर. सी. पटेल स्कूल, सेंट जॉन्स हायस्कुल, मुलुंडमधील जे जे अकादमी, भांडुपमधील कॉसमॉस हायस्कुल, चेंबूरमधील श्री सनातन धर्म हायस्कुल चेंबूर, माटुंग्यातील डॉन बॉस्को हायस्कुल तर विक्रोळीतील गोदरेज उदयांचल हायस्कूलच्या दोन प्रकल्पांची निवड झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -