घरमुंबईVideo : ट्रेन येताच वृद्धाने मारली उडी; जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

Video : ट्रेन येताच वृद्धाने मारली उडी; जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

Subscribe

मुंबई सेट्रल स्थानकात ट्रेन येताच एका वृद्ध व्यक्तीने रेल्वेखाली येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्राण वाचवण्यात एमआरएफच्या जवानांना यश आले आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेट्रल स्थानकात ट्रेन येताच एका वृद्ध व्यक्तीने रेल्वेखाली येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमआरएफच्या समयसूचकतेमुळे या वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचले आहे. मुंबई सेट्रल स्थानकावर आजोबा ट्रेनची वाट पाहत होते. ट्रेन येताच आजोबांनी फ्लॅटफॉर्मवर उतरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजोबा आत्महत्या करत असल्याचे पाहताच स्थानकावर असलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. प्रवाशांचा हा आरडाओरड ऐकून घटनास्थळी एमआरएफ जवान मनोज आणि अशोक यांनी रुळावर उडी मारत आजोबांना बाजूला केले. आजोबांना बाजूला केल्यानंतर ट्रेन निघून गेली आणि आजोबांचे प्राण वाचवण्यात जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

आजोबांचे प्राण वाचवण्याच जवानांना यश आले असले तरी मात्र, त्यांनी ही आत्महत्या का केली आहे. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राण वाचवल्यामुळे कुटुंबियांनी देखील एमआरएफच्या जवानांचे मनापासून आभार मानले आहेत. मात्र, या वृद्ध व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वृद्धाला वाचविण्यासाठी MSF (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) पोलिसाने घेतली रेल्वे ट्रॅकवर उडी

वृद्धाला वाचविण्यासाठी MSF (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) पोलिसाने घेतली रेल्वे ट्रॅकवर उडी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜುಲೈ 6, 2019

- Advertisement -

हेही वाचा – ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

हेही वाचा – मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; गटारे तुडुंब भरली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -