घरताज्या घडामोडी'मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करू?' शरद पवारांची जयंत पाटलांवर प्रतिक्रिया!

‘मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करू?’ शरद पवारांची जयंत पाटलांवर प्रतिक्रिया!

Subscribe

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून राज्यात राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले होते. याविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारणा केली असता पवारांनी त्याला मिश्किलपणे उत्तर दिलं. ‘जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते झाले का? उद्या मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करू? मला कुणी करणार नाही, म्हणून मी वाटून घेत नाही’, असं शरद पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर तूर्तास तरी पडदा पडला आहे. एकीकडे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं चित्र उभं राहिलं असताना सत्तेतला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ज्येष्ठ मंत्र्याने अशा प्रकारे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करणं राजकीय अभ्यासकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता.


वाचा सविस्तर – ‘मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण…’; जयंत पाटलांनी व्यक्त केली इच्छा

‘आमचा तो निष्कर्ष बरोबर होता!’

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी धनंजय मुंडेंविषयी देखील प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यावर पत्रकारांनी विचारलं असता पवार म्हणाले, ‘तक्रार परत घेण्याची बातमी वाचायला मिळाली. आम्हाला असं वाटलं की यामध्ये सत्यता पडताळून पाहाण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय आपण निष्कर्षावर येऊ नये. आमचा तो निर्णय बरोबर होता असं आता तरी दिसतंय. विरोधक दोन्हीबाजूंनी आरोप करतात. आधी मुंडेंवर केले, आता दुसऱ्या बाजूने करत आहेत. यासंदर्भात पोलिसांना योग्य तो तपास करू द्या.’

- Advertisement -

हेही वाचा – ‘मला तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं’

दरम्यान, धनंजय मुंडेंवर तक्रार करणाऱ्या महिलेने ‘आमचे कौटुंबिक वाद होते म्हणून मी मुंडेंविरूद्ध अशी तक्रार केली’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -