घरताज्या घडामोडीपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करावी, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ‘माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करावी’, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंनी सर्वांनी कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

या आधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे या राजकीय लोकांनाही कोरोनाची लागण झाली होती. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांनी २५ हजारांचा टप्पा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पालिका

 

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाची लसीची निर्मिती राज्य सरकार करणार; कंपन्यांसोबत बोलणी सुरु

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -