घरताज्या घडामोडीसुशांतच्या कुटुंबियांनी पाठविलेल्या नोटीसीची कल्पना नाही - संजय राऊत

सुशांतच्या कुटुंबियांनी पाठविलेल्या नोटीसीची कल्पना नाही – संजय राऊत

Subscribe

सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसच सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे नेला पाहिजे आणि तेच नेतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणला जाऊ नये असं  संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज सांगितलं. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.

सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी “सुशांत सिंह प्रकरणावरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांत सिंहला न्याय मिळो अशी माझी प्रार्थना असल्याचं,” सांगितलं.

- Advertisement -

दुसरीकडे सुशांत संग राजपुतच्या कुटुंबियांनी संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. याबद्दल संजय राऊत यांना विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “कुटुंबाची काय मागणी आहे याची कल्पना नाही.’’

महाराष्ट्रात सगळं ठीक

राजस्थानमधील राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्रात सर्व काही ठीक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात मुसळधार पावसात सगळं वाहून गेलं असा टोलाही त्यांनी लगावला. नारायण राणे यांच्या ऑक्टोबरपर्यंतच सरकार टिकणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना प्रयत्न करु राहू देत असं संजय राऊत यांनी म्हटलं. महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, शरद पवार तसंच सगळे मंत्री प्रयत्न कत आहेत. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. येथे जनतेचं हित याला सगळ्यात मोठं प्राधान्य द्यावं लागतं. प्रधानमंत्र्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्राच्या हितावरच बोट ठेवलं होतं,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -