घरमुंबईकाम केलं मनसेनं, उद्घाटन करतेय शिवसेना!

काम केलं मनसेनं, उद्घाटन करतेय शिवसेना!

Subscribe

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपण केलेल्या कामाची जाहिरातबाजी मतदार राजासमोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही ठिकाणी हे पक्ष आपण न केलेल्या कामाचं श्रेय देखील घेत आहेत काय? असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. हा प्रकार आहे मुंबईतल्या दादरमधला, आणि श्रेय घेणारा पक्ष आहे शिवसेना तर काम केलेला पक्ष आहे मनसे. विशेष म्हणजे मनसेने दादरमध्ये केलेल्या कामाला तेव्हा विरोध करणाऱ्या शिवसेनेनेच आता त्या कामाचं भूमिपूजन करण्याचा घाट घातला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता या कामाचं भूमिपूजन होणार आहे. या प्रकारावरून शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या दादरमध्ये एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.

आता निवडणुका जवळ आल्यावर यांना दादर चौपाटीची आठवण आली. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरा राजकीय पक्ष घेतोय याचं दुख नाही, पण मनसेला श्रेय मिळू नये म्हणून शिवसेनेने विनाकारण गेली ५ वर्षे ह्या बंधाऱ्यावरून चालण्यास लोकांना बंदी केली होती, हे मात्र निश्चितच दुर्दैवी आहे.

नितीन सरदेसाई, नेते, मनसे

शिवसेनेचे आयत्या बिळावर नागोबा?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते २०१२मध्ये दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभीकरणाचं काम सुरू झालं. भूमिपूजन होऊन येथील चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास सुरुवात झाली. २०१४मध्ये चौपाटीच्या सुशोभिकरणाचे काम पूर्णही झाले. पण शिवसेनेने मात्र या बंधाऱ्यावरील सुशोभित पदपथाच्या वापरास महापौर बंगल्याच्या सुरक्षिततेचं कारण देऊन विरोध केला. इतकंच नाही तर त्या जागेला कुंपणही घातले. ज्यामुळे काम पूर्ण होऊनही दादरकरांना या पदपथाचा वापर करता येत नव्हता. मात्र बुधवारी अचानक ५ वर्षांनी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी या कामाच्या सुशोभिकरणाचं भूमिपूजन जाहीर केलं. ‘शिवसेनेने ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही आपली वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले आहे’, अशी आहे.

- Advertisement -

मनसेची मात्र जोरदार टीका

२०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचे सदा सरवणकर दादर-माहीमचे आमदार म्हणून तर राहुल शेवाळे खासदार म्हणून निवडून आले. ‘मागील साडे चार वर्षात त्यांचे दादर चौपाटीकडे लक्ष नव्हते. मात्र अचानक बुधवारी दिनांक ६ मार्च २०१९ रोजी जो बंधारा २०१४ सालीच बांधून पूर्ण आहे, जिथे सुशोभित वॉक-वे आधीच तयार आहे, तिथे केवळ राजकीय लाभासाठी नव्याने भूमिपूजन केलं जात आहे’, अशी टीका नितीन सरदेसाई यांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -