घरमुंबईउल्हासनगरच्या दोन नगरसेविकांना भाजपाची कारणे दाखवा नोटीस

उल्हासनगरच्या दोन नगरसेविकांना भाजपाची कारणे दाखवा नोटीस

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या ज्योती कलानी यांच्या प्रचारात आता त्यांच्या सून व उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी या भाग घेत आहेत. त्यांच्यासोबत अन्य दोन नगरसेविका देखील ज्योती कलानी यांच्या प्रचारात भाग घेत आहेत. ज्या भाजप पक्षाच्या आहेत, त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना ही बाब कळवली आहे. यानंतर भाजपाने महापौर पंचम कलानी व दोन अन्य नगरसेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपाचे पालिकेतील गटनेते जमनू पुरस्वानी यांनी ही नोटीस स्पिड पोस्टद्वारे पाठवली असल्याची माहिती प्रवक्ते मनोज लासी यांनी दिली.

उल्हासनगर विधानसभा मतदार संघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी आणि महापौर पंचम कलानी यांच्यात उमेदवारीची चढाओढ होती. पंचम यांना उमेदवारी मिळणार, असे सांगण्यात आल्याने किंबहुना आश्वासन दिल्या गेल्याने सुनेच्या प्रचाराच्या वेळी अडचण नको म्हणून ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र पंचम कलानी यांना अखेरपर्यंत उमेदवारीसाठी झुलवत ठेवण्यात आल्यावर भाजपाने रात्री जाहिर केलेल्या यादीत कुमार आयलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलणी करून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची तयारी ज्योती कलानी यांनी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने प्रथम त्यांच्या यादीत नगरसेवक गटनेते भारत गंगोत्री याचे नाव जाहीर केले होते. मात्र ज्योती कलानी या विद्यमान आमदार असल्याने पक्षाने त्यांना प्राधान्य दिले. ज्योती कलानी यांनी ३ तारखेला उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासोबत महापौर पंचम कलानी, माजी महापौर हरदास माखिजा उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा प्रचार सुरु असून त्यात महापौर पंचम कलानी सहभागी होत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा उल्हासनगरात झाली. या सभेकडे देखील पंचम यांनी पाठ फिरवली. त्यामुळे गटनेते जमनु पुरस्वानी यांनी पंचम कलानी यांच्या सोबत भाजपाच्या नगरसेविका शुभंगिनी निकम, दीपा पंजाबी यांना शोकॉज नोटिसा बजावल्या आहेत. याबाबत महापौर पंचम कलानी यांच्याशी संपर्क साधला असता, अशी कोणतीच नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -