घरमुंबई'जियो नही चल रहा' फोटोग्राफर्सची थेट मुकेश अंबानीकडे तक्रार

‘जियो नही चल रहा’ फोटोग्राफर्सची थेट मुकेश अंबानीकडे तक्रार

Subscribe

तुमची मोबाईल नेटवर्क सर्विस किंवा इंटरनेट व्यवस्थित चालत नसेल तर तुम्ही काय करता? अर्थातच संबंधित कंपनीच्या कस्टमर सर्विस नंबरवर फोन करता किंवा त्यांच्या कस्टमर सर्विस सेंटरला भेट देऊन तक्रार दाखल करतात. मात्र एका पठ्ठ्याने थेट मोबाईल नेटवर्क कंपनीच्या मालकालाचा आपली तक्रार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा मालक दुसरा तिसरा कुणी नसून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी आहेत. दीपिका पादुकोन आणि रनवीर सिंह यांच्या रिसेप्शनचा शाही सोहळा १ डिसेंबर रोजी मुंबईत संपन्न झाला. यावेळी अनेक बॉलिवूड आणि उद्योगपतींनी या रिसेप्शनला हजेरी लावली होती. मुकेश अंबानी यांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत दीपवीरच्या रिसेप्शनला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी निता अंबानी, मुलगी इशा आणि मुलगा आकाश आणि अनंत उपस्थित होते. मात्र या सोहळ्याला फोटोग्राफर्सनी अंबानी यांच्या जिओची चांगलीच फजिती केली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या सोहळ्याला सहपरिवार आल्यानंतर अंबानी यांनी फोटोग्राफर्सला फोटो देण्यासाठी उभे राहिले असताना ‘सर, जियो नही चल रहा’ अशा हाका फोटोग्राफर्स द्यायला लागले. त्यामुळे अंबानी यांची चांगलीच फजिती झाली मात्र तेवढ्यात तिथे अभिनेता संजय दत्त यांची एंट्री झाली. त्यामुळे फोटोग्राफर्सचे लक्ष त्यांच्याकडे वळले आणि अंबानी यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

- Advertisement -
SBI चे ग्राहक कितीही वेळा काढू शकतात एटीएममधून पैसे

जिओ लाँच केल्यानंतर मुकेश अंबानी यांनी हे सर्वात जास्त वेगवान इंटरनेट सेवा देणारे नेटवर्क ऑपरेटर असेल असे सांगितले होते. जिओ आल्यानंतर इतर नेटवर्क सेवा देणाऱ्या कंपन्यांना चांगलीच स्पर्धा मिळाली होती. त्यानंतरच स्वस्त इंटरनेट देण्याची एक स्पर्धाच सर्वांमध्ये सुरु झाली होती. ४जी इंटरनेट सेवा स्वस्तात दिल्यानंतर अनेकांनी आपला नेटवर्क प्रोवाईडर बदलण्यास सुरुवात केली. मात्र आता जिओचा इंटरनेट स्पीट स्लो होत असल्याची तक्रार जिओचे ग्राहक करत आहेत.

दीपवीरच्या रिसेप्शन सोहळ्यात या फोटोग्राफरने थेट मुकेश अंबानी यांनाच ‘जिओ चल नही रहा’ असे ओरडून सांगितल्यामुळे या अनोख्या तक्रारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मुकेश अंबानी यांना फोटोग्राफरचे ते वक्तव्य त्या गोगांटात त्यावेळी ऐकायला गेले की नाही, याबद्दल शंका आहे. मात्र त्यानंतर हा व्हायरल झालेला व्हिडिओ मात्र त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -