घरमहाराष्ट्रधनगर समाजाने केली वचननाम्याची होळी

धनगर समाजाने केली वचननाम्याची होळी

Subscribe

मराठा समाजापाठोपाठ आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरला होता. हिवाळी अधिवेशनातही हा धनगरसमाजाच्या आरक्षाचा मुददा गाजला. याआधी देखील अनेक आंदोलने धनगर समाजाने केली आहेत.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज धनगर समाजाकडून वचननाम्याची होळी करण्यात आली. धनगर संघर्ष समिती व समाज बांधव समाजाच्यावतीने आज परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वचननाम्याची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी राज्य शासनाला धनगर समाजाच्या आरक्षाबाबतचा टीसचा अहवाल मिळाला होता. तरीदेखील शासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे धनगर समाज संतप्त झाला असून त्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. यासाठीच धनगर समाजातील बांधवांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जमवून वचननाम्याची होळी केली.

आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक

- Advertisement -

 

सरकारविरोधात केली घोषणाबाजी

युती सरकारने तयार केलेल्या जाहीरनाम्यात २०१४ च्या निवडणुकीवेळी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला होता. याच जाहीरनाम्याची होळी धनगर समाजाच्यावतीने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतरप अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना देखील निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
का आली धनगर समाजावर शिमगा करण्याची वेळ ?

आधीही केली आंदोलने 

मराठा समाजापाठोपाठ आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरला होता. हिवाळी अधिवेशनातही हा धनगरसमाजाच्या आरक्षाचा मुददा गाजला. याआधी देखील अनेक आंदोलने धनगर समाजाने केली आहेत. आता आरक्षणाची अंंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -