घरमुंबईमहापालिका शाळांच्या मुलांना स्मार्ट ओळखपत्र

महापालिका शाळांच्या मुलांना स्मार्ट ओळखपत्र

Subscribe

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट ट्रॅकिंग चीप व टान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन कार्ड’ देण्याचा विचार प्रशासन करत आहे. याबाबतचे स्मार्ट ओळखपत्र देण्यासंदर्भातील पडताळणी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट ट्रॅकिंग चीप व टान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन कार्ड’ देण्यात यावे, जेणेकरून मुले शाळेत उपस्थित नसल्यास या ओळखपत्राच्या सहाय्याने पालकांना व शाळेतील शिक्षकांना, मुले ज्याठिकाणी आहेत, ते स्थान समजू शकेल आणि त्यानुसार त्यांना पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, अशी मागणी शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार प्रशासन करत आहे. महापालिका शाळांमधील अनेक मुले घरातून शाळेत निघतात, परंतु शाळेत न जाता बाहेर भटकतात. त्यामुळे या स्मार्ट कार्डद्वारे शिक्षकांना गैरहजर विद्यार्थी घरी आहे किंवा बाहेर कुठे भटकत आहे, याचीही माहिती कळेल, असेही काते यांनी स्पष्ट केले होते.

- Advertisement -

या मागणीबाबत प्रशासन आपला अभिप्राय देताना, याबाबत स्मार्ट कार्ड देता येईल का याच्या पडताळणीची कार्यवाही करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान विभागाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेमार्फत ८ माध्यमांच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र लॅमिनेट करून आयकार्ड होल्डरसह गळ्यातील दोरीसह पुरवली जाते. २०१९-२०साठी ओळखपत्रे मुद्रित झालेली आहेत. त्या ओळखपत्रांचे लॅमिनेशन करणे तसेच आयकार्डसह दोरी पुरवठा करण्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अन्य ओळखपत्रांचा विचार करणे योग्य ठरणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -