घरमुंबईफोटोतून स्मृती इराणींनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

फोटोतून स्मृती इराणींनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

Subscribe

'हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है' असे कॅप्शन स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोला दिले आहे.

शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी वादग्रस्त विधान केले होते. ‘रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का?’ असा वादग्रस्त सवाल स्मृती इराणी यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. या सगळ्या घडामोडीनंतर आता स्मृती इराणी यांनी आणखीन एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. या फोटोच्या माध्यमातून आपले वक्तव्य योग्य असल्याचा सुचक इशारा त्यांनी विरोध करणाऱ्यांना दिला आहे. या फोटोतून आपली बाजू योग्य असल्याचे स्मृती इराणी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी फोटो सोबत ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ असे विधान केले आहे.

काय आहे फोटोमध्ये?

स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो अपलोड केला आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतील फोटो एडिट करुन सासूच्या जागी स्मृती इराणी यांना दोराने बांधले असल्याचा या फोटोमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोला ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ असे कॅप्शन इराणी यांनी दिले आहे.

- Advertisement -

नेमकं काय होते स्मृती इराणी यांचे वक्तव्य?

‘देवाच्या मंदिरात जाणं आणि प्रार्थना करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण, मासिक पाळी आल्यानंतर तुम्ही मंदिरात कशा जाऊ शकता?’ असा सवाल देखील स्मृती इराणी यांनी केला आहे. ‘तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले पॅडस नेऊ शकत नाही मग देवाच्या दरबारात तुम्ही अशा अवस्थेमध्ये कशा काय जाऊ शकता?’ असा सवाल स्मृती इराणी यांनी केला होता. महिलांना मासिक पाळी येणे हे नैसर्गिक बाब आहे. मग अशा अवस्थेत तुम्ही मंदिरामध्ये कशा जाऊ शकता? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. दरम्यान हे माझे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्टीकरण देखील इराणी यांनी दिले. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑबझर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.


हेही वाचा – आमदार बलात्कार करतात, पण पंतप्रधान गप्प बसतात – राहुल गांधी

- Advertisement -

हेही वाचा – स्मृती इराणींच्या वक्तव्यावर काय वाटतं तरूणाईला?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -