घरटेक-वेकव्हॉट्सअॅप अपडेट! एका स्वाईपवर करा रिप्लाय

व्हॉट्सअॅप अपडेट! एका स्वाईपवर करा रिप्लाय

Subscribe

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीचे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी व युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन येतं. काल रात्रीपासून अनेकांना व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट आले आहे. ज्यांनी अॅप अपडेट केले नसेल तर त्यांनी लवकर अपडेट करुन घ्या. कारण हे अपडेट खूपच खास आहे. या नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅपने काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

एका स्वाईपवर रिप्लाय

ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तिने मेसेज केला आणि त्या व्यक्तीला आपल्याला ग्रुपमध्येच रिप्लाय करायचा असेल तर पूर्वी त्या व्यक्तिच्या मेसेजवर लाँग प्रेस करावे लागत होते. त्यानंतर मोबाईल स्क्रिनच्या कोपऱ्यात रिप्लाय या ऑप्शनवर क्लिक करावे लागत होते. आता इतकी मोठी प्रोसेस करायची गरज नाही. नव्या अपडेटमध्ये ज्या मेसेजला रिप्लाय करायचा असेल तो मेसेज फक्त स्वाईप करायचा. लगेच समोर रिप्लायचा ऑप्शन येतो. आपण त्यावर रिप्लाय टाईप करुन सेंड करायचा. रिप्लायसाठीची प्रोसेस व्हॉट्सअॅपने सोपी केली आहे.

- Advertisement -

वाचा – ‘हे’ स्मार्टफोन्स भारतात सर्वाधिक विकले जात आहेत, पहा त्यांचे स्पेसिफिकेशन

हेदेखील नवे बदल

लोकांच्या व्हॉटसअॅप स्टेटसवर रिप्लाय करताना पूर्वी फक्त टेक्स, GIF, फोटो, व्हिडियो आणि स्मायली वापरता येत होत्या. नव्या अपडेटमध्ये व्हॉईस मेसेज, लोकेशन, डॉक्युमेंटस आणि कॉन्टॅक्ट शेअर करता येणार. व्हॉटसअॅपच्या नोटीफीकेशनमध्ये सध्या मेसेज, इमेज, GIF दिसतात. मात्र आता व्हिडियोही दिसू शकणार आहेत. तसेच बबल अॅक्शन मेनूचे डिझाईन व्हॉट्सअॅपने बदलले आहे. स्क्रीनवर जास्त वेळ टॅप केल्यावर तुम्हाला हा मेनू दिसू शकेल. तसेच यामध्ये डिलिट, रिप्लाय, फॉरवर्ड, स्टार, कॉपी आणि इतरही अनेक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -