घरमुंबईSnake in Bombay High Court: न्यायाधीशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह! मुंबई उच्च न्यायालयाच्या चेंबरमध्ये...

Snake in Bombay High Court: न्यायाधीशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह! मुंबई उच्च न्यायालयाच्या चेंबरमध्ये सापडला साप

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कारण शुक्रवारी चक्क न्यायाधीशांच्या चेंबरमध्येच एक भला मोठा साप आढळून आला आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र न्यायाधीश त्यावेळी चेंबरमध्ये उपस्थित होते की नाही, हे सध्या समजू शकलेले नाही. मात्र, न्यायालयात साप आढळल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2018 मध्ये नवी मुंबईत एका न्यायाधीशावर सापाने हल्ला केला होता.

- Advertisement -

मात्र या सापामुळे न्यायालयात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. चेंबरमध्ये साप असल्याची बातमी न्यायालयात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे साप बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र सर्पमित्रांच्या मदतीने या सापाची सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास न्यायमूर्ती बोरकर यांच्या चेंबरमध्ये हा साप आढळून आला होता. यानंतर सर्पमित्राच्या मदतीने सापाला पकडून गोणीमध्ये भरुन चेंबरबाहेर आणण्यात आले. परंतु हा साप नेमका आला कुठून आणि तो न्यायाधिशांच्या चेंबरपर्यंत पोहचला कसा याचा तपास सुरु आहे.

कोल्लम येथील न्यायालयाने एका व्यक्तीला साप अंगावर सोडून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. केरळ पोलीस प्रमुखांनी ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचे वर्णन केले होते. मात्र परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेच आरोपीचा पर्दाफाश करता आला. कोल्लम येथील सहाव्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने, सुरज नामक आरोपीला गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांची २३ वर्षीय पत्नी उथरा हिची झोपेत अंगावर साप सोडून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यामुळे आज न्यायालयात चेंबरमध्ये सापडलेला साप अशाच प्रकारचा गुन्हा घडवण्यासाठी तर आणला नव्हता का याचा पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -