घरमुंबईजागतिक हृदय दिनानिमित्त, पोलिसांना खास प्रशिक्षण

जागतिक हृदय दिनानिमित्त, पोलिसांना खास प्रशिक्षण

Subscribe

नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरच्यावतीने नवी मुंबई पोलिसांना, खास सीपीआर प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले.

आधुनिक जीवनशैलीमुळे भारतात हृदयविकार वाढीस लागले असून आजच्या तरुण पिढीलासुद्धा या विकाराने ग्रासले आहे. याच पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक हृदयदिनानिमित्त, नवी मुंबईच्या पोलिसांना सीपीआरचे खास प्रशिक्षण देण्यात आले. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरच्यावतीने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. पोलीसांना प्रथमोपचाराचे तंत्र माहीत असल्यास ते हार्ट अटॅक आलेल्या एखाद्या रुग्णाचे तातडीने प्राण वाचवू शकतात. नेमक्या याच उद्देशातून नवी मुंबई पोलिसांना या कार्यशाळेत प्रथमोपचारचे धडे देण्यात आले.  यावेळी १५० हून अधिक पोलीस उपस्थित होते. तेरणा मेडिकल कॉलेजच्या भूलतज्ञ डॉ.‌अर्चना म्हात्रे  यांनी या कार्यशाळेत पोलिसांना प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून सराव करून घेतला. यावेळी मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदही उपस्थित होती.

- Advertisement -

मधुमेह ,उच्चरक्तदाब ,फास्टफूड  खाद्य संस्कृतीची क्रेझ ,मानसिक ताणतणाव आदी कारणांमुळे हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहे. हृदयविकार झालेल्या अनेक रुग्णांना आपल्याला हृदयविकार आहे याचीच जाणीव नसते. त्यामुळे कधीकधी अचानक रस्त्यामध्ये हार्ट अटॅक येणे, प्रवासामध्ये चक्कर येणे अथवा अचानक हृदय प्रक्रिया बंद पडणे, असे प्रकार घडतात. अशावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांना नक्की काय उपचार करावे? याची माहिती नसते आणि त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्याआधीच तो मरण पावतो. अशावेळी हे सीपीआर प्रशिक्षण खूप उपयोगी पडते. याच जाणीवेतून सुमारे २००० पोलिसांना सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आलं.– डॉ. महेश घोगरे, तेरणा हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ


वाचा : पुढील वर्षी होणार, ३३ कोटी वृक्षांची लागवड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -