घरमुंबईलोकलच्या दारात उभे राहाल तर तुरुंगवास होऊ शकतो!

लोकलच्या दारात उभे राहाल तर तुरुंगवास होऊ शकतो!

Subscribe

मुंबईतील लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. मध्य रेल्वेने आता लोकल रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरु केली आहे. तसेच लोकल गाड्यांमध्ये गर्दीच्या वेळी दारात उभे राहून इतर प्रवाशांना चढू न देणाऱ्या प्रवाशांनाही पकडण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने अशा प्रकारची मोहीम सुरु केली असून, आतापर्यंत ३ महिन्यांत तब्बल १,२५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

वरिष्ठांची स्पष्टोक्ती

मुंबई विभागातील आरपीएफचे वरीष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोड यांनी सांगितले की,
कारवाईच्या पहिल्या दिवशीच डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांमध्ये २९ प्रवासी पकडले गेले. त्यांना रेल्वे कायद्याच्या कलम १५६ अंतर्गत (रेल्वेच्या इंजिनवर, छप्परवर आणि दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्यांसाठी असलेल्या कायद्या अंतर्गत) पकडून ५०० ​​रुपयांचा दंड भरून सोडण्यात आले.

- Advertisement -

 


१ ते ५ वर्षांचा तुरुंगवास

लोकल रेल्वेला लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारचा गुन्हा वारंवार घडल्यास त्या प्रवाशाला १ ते ५ वर्षाचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. तसेच प्रवासादरम्यान मारहाणीसारखी गैरकृत्य करणे किंवा इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहोचेल असे कृत्य यासाठी १५४ कलमांतर्गत आणि इतरांना लोकलमध्ये चढण्यास परावृत्त करणे यासाठी कलम १४३ अंतर्गत १ ते ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

- Advertisement -

का सुरू केली ही मोहीम?

लोकल प्रवाशांकडून बऱ्याचदा याविषयी तक्रारी दाखल झाल्या होत्या. प्रवाशांच्या मते, बऱ्याच ठिकाणी ठराविक गट लोकलमध्ये चढताना इतर प्रवाशांना चढू देत नाहीत. खास करुन सीएसएमटी-ते-कर्जत या मार्गावरुन जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये डोंबिवलीमधून चढताना काही ठराविक ग्रुप इतरांना रेल्वेमध्ये चढू देत नाहीत. त्यांच्यामधील भांडणं प्रसंगी टोकाला गेली होती. तसेच अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. प्रवाशांकडूनही यावर तोडगा काढण्याची विनंती अनेकदा केली गेली होती. त्यामुळे अशा प्रकारची मोहीम राबवणे गरजेचे झाले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -