घरमुंबईमान्सूनची जोरदार आगेकूच; 4 किंवा 5 जूनला केरळच्या किनारपट्टीवर धडकणार

मान्सूनची जोरदार आगेकूच; 4 किंवा 5 जूनला केरळच्या किनारपट्टीवर धडकणार

Subscribe

मुंबई : जून महिना सुरू झाला तरी लोकांना उष्णतेचा सामना करावा लागतो आहे. परंतु या उष्णतेपासून लोकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण मान्सूसने जोरदार आगेकूच केली आहे. त्यामुळे मान्सून 4 किंवा 5 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे. (Strong advance of Monsoon, It will hit the Kerala coast on June 4 or 5)

मान्सूनची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत आहे, खासकरून शेतकरी. कारण जून महीना सुरू झाला तरी नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई कमाल तापमान 35 अंशांवर आहे, तर राज्यातील काही भागात पारा 40 अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळच्या किनाऱ्यापासून मान्सून केवळ 400 किमीवर आहे. सध्या मान्सून दक्षिण अरब सागर, मालदीव, कोमोरिन क्षेत्रात असून दक्षिण बंगालची खाडी व पूर्व मध्य बंगाल खाडीत मान्सूनची आगेकूच सुरू आहे.

- Advertisement -

दरवर्षी केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होणारा मान्सून यंदा मात्र उशीरा पोहचणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी 8 दिवस उशिराने मान्सूस येणार असल्यामुळे जूनच्या 14 ते 15 तारखेपर्यंत राज्यात दस्तक देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 96 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे जूनमधे सरासरीच्या 25 टक्के कमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविली आहे. दक्षिण-मध्य कोकणात सामान्य पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी जून महिन्यात तापमान एक-दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सुरुवातीचे काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

दुसऱ्या आठवड्यात मान्सूनची वेग वाढेल
मान्सून उशीरा येत असल्यामुळे जुनच्या पहिल्या आठवड्यात गती कमी असेल, मात्र दुसऱ्या आठवड्यात वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार मान्सून कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ईशान्येतील सात राज्यांत दिसून येईल.

- Advertisement -

मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेची लाट आवश्यक

जमिनीतील आर्द्रता संपून ती मान्सूनला आकर्षित करण्यासाठी मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेची लाट आवश्यक असते. परंतु यावर्षी मार्च आणि मेदरम्यान 12 टक्के पाऊस पडल्यामुळे तसे होऊ शकले नाही. यावर्षी सर्वाधिक १३६ टक्क्यांहून जास्त पाऊस मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्रामध्ये पडला. त्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार व झारखंड वगळता देशातील उर्वरित भागात एप्रिल-मेदरम्यान उष्णतेची लाट दिसून आली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -